'अजिंक्यतारा किल्ल्यावरून आत्महत्या करतोय'; मित्राला मेसेज करून त्यानं घर सोडलं, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:21 PM2020-06-08T13:21:02+5:302020-06-08T13:25:21+5:30

अजिंक्यताऱ्यांवरून आत्महत्या करतोय, असा मेसेज मित्राच्या मोबाईलवर पाठवून साताऱ्यांतील युवकाने घर सोडले. हा मेसेज वाचून घरातील लोक अक्षरश: हादरून गेलेत. गेल्या बारा तासांपासून पोलिसांसह युवकांनी अजिंक्यताऱ्यांवर संबंधित युवकाचा शोध घेतला मात्र, तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील लोक चिंतेत पडले आहेत.

Suicide from Ajinkyatara! The youth's message shook the house | 'अजिंक्यतारा किल्ल्यावरून आत्महत्या करतोय'; मित्राला मेसेज करून त्यानं घर सोडलं, अन्...

'अजिंक्यतारा किल्ल्यावरून आत्महत्या करतोय'; मित्राला मेसेज करून त्यानं घर सोडलं, अन्...

googlenewsNext
ठळक मुद्देअजिंक्यताऱ्यावरून आत्महत्या करतोय.! युवकाच्या मेसेजने घरातील हादरलेयुवकाचा अद्याप थांगपत्ता नाही; बारा तासांनंतरही शोध सुरू

सातारा : अजिंक्यताऱ्यांवरून आत्महत्या करतोय, असा मेसेज मित्राच्या मोबाईलवर पाठवून साताऱ्यांतील युवकाने घर सोडले. हा मेसेज वाचून घरातील लोक अक्षरश: हादरून गेलेत. गेल्या बारा तासांपासून पोलिसांसह युवकांनी अजिंक्यताऱ्यांवर संबंधित युवकाचा शोध घेतला मात्र, तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे त्याच्या घरातील लोक चिंतेत पडले आहेत.

याबाबत अधिक महिती अशी, साताऱ्यांतील शनिवार पेठ परिसरात राहणारा रोहन संदीप पवार (वय २३) हा रविवारी दुपारी तीन वाजता दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. जाताने त्याने मित्राच्या मोबाईलवर मेसेज पाठविला. मी अजिंक्यताऱ्यावरून आत्महत्या करतोय. हा मेसेज पाहून वडील अशक्षरश: हादरून गेले.

वडिलांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि पेठेतील युवक तातडीने अजिंक्यताऱ्यावर पोहोचले. अजिंक्यताऱ्याच्या चारीबाजूने रोहनचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. सोमवारी सकाळीही पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. परंतु अद्याप पर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. कोणत्या कारणातून त्याने ही टोकाची भूमिका घेतली, हे अद्याप समोर आले नाही.

मोबाइलचे लोकेशन मात्र भलतेच..
रोहनच्या मोबाइलचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता भलतेच दाखवत आहे. कधी सातारा तालुक्यातील परळी तर कधी निगडी दाखवत असल्यामुळे नेमका काय प्रकार आहे, हे पोलिसांना समजेनासे झाले आहे. रोहनची गाडी अजिंक्यताºयावर आहे. त्यामुळे तेथे गाडी असताना त्याचा मोबाईल कोण घेऊन फिरत आहे, याची

 

Web Title: Suicide from Ajinkyatara! The youth's message shook the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.