जिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 06:10 PM2020-12-02T18:10:26+5:302020-12-02T18:14:50+5:30

farmar, sataranews मागील दीड महिन्यापासून रब्बी हंगामातील पेरणीला सुरूवात झाली असलीतरी अद्यापही ६० टक्क्यांच्या वर पेर गेली नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्वारीची पेरणी ७९ टक्के क्षेत्रावर झाली असून गहू आणि हरभºयाची अत्यल्प आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

Sowing on 1.5 million hectares in the district, 60 percent complete | जिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण

जिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण अपेक्षित गती नाही; ज्वारीची ७९ टक्के क्षेत्रावर पेर, गहू, हरभऱ्याची अजुनही अत्यल्प

सातारा : मागील दीड महिन्यापासून रब्बी हंगामातील पेरणीला सुरूवात झाली असलीतरी अद्यापही ६० टक्क्यांच्या वर पेर गेली नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्वारीची पेरणी ७९ टक्के क्षेत्रावर झाली असून गहू आणि हरभऱ्याची अत्यल्प आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. गहू ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस यांचे क्षेत्र अत्यल्प आहे.

आॅक्टोबर महिना सुरू झाल्यापासून काही तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरूवात झाली होती. पण, त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला. तर काही ठिकाणी ज्वारी पिकाचे नुकसान झाले. परिणामी दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर ओढले. सध्या जिल्ह्यातील पेरणी ६० टक्के झाली आहे. तर १ हजार ३० हजार ५६४ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड , सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे. ज्वारीची आतापर्यंत १ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची आतापर्यंत १७.४० टक्के, मका ४३.५२ आणि हरभऱ्याची ३१.२३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

माण तालुक्यात ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी...

जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कऱ्हाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पेरणी माण तालुक्यात ८१.१२ टक्के झाली आहे. तर पेरणी क्षेत्र ३२ हजार ३०० हेक्टर झाले आहे. त्यानंतर खटावमध्ये ७२.६८ टक्के झाली आहे. तर फलटण ४६, सातारा तालुका ४१, वाई ६३, कऱ्हाड तालुक्यात ५८.६० क्षेत्रावर, पाटण ६०, जावळी तालुका १२.५४, कोरेगावमध्ये ६९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Web Title: Sowing on 1.5 million hectares in the district, 60 percent complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.