सातारा : सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतुुकीची कोंडी, महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:51 PM2018-04-28T14:51:58+5:302018-04-28T14:51:58+5:30

चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

Satara: Due to frequent buses, traffic congestion, Mahabaleshwar, Panchgani, on the highway | सातारा : सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतुुकीची कोंडी, महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची पसंती

सातारा : सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतुुकीची कोंडी, महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची पसंती

googlenewsNext
ठळक मुद्देसलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतुुकीची कोंडीमहाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची पसंती

सातारा : चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

शनिवार, रविवार तसेच बुद्ध पौर्णिमा व कामगार दिनानिमित्त बॅँका तसे शासकीय कार्यालयांना सलग चार सुट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावी फिरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत.

थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने याठिकाणी पर्यटक संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

वाहनांच्या संख्येने शनिवारी पुणे-बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. खंबाटकी घाटातील वाहतुकही संथ गतीने सुरू होती. आनेवाडी तसेच तासवडे टोल नाक्यावर वाहनांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.

Web Title: Satara: Due to frequent buses, traffic congestion, Mahabaleshwar, Panchgani, on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.