सातारा : दहा दिवसांनंतर महाबळेश्वर, नवजाला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:58 PM2018-10-04T14:58:50+5:302018-10-04T15:00:26+5:30

पश्चिम भागातील महाबळेश्वर, नवजा येथे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली हजेरी लावली तर कोयनेलाही बरसात झाली. पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या कोयना धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Satara: After ten days Mahabaleshwar, Navjala rain | सातारा : दहा दिवसांनंतर महाबळेश्वर, नवजाला पाऊस

सातारा : दहा दिवसांनंतर महाबळेश्वर, नवजाला पाऊस

ठळक मुद्देदहा दिवसांनंतर महाबळेश्वर, नवजाला पाऊसपूर्व भागातही हजेरी : कोयनेतून ११०० क्युसेक विसर्ग सुरू

सातारा : पश्चिम भागातील महाबळेश्वर, नवजा येथे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली हजेरी लावली तर कोयनेलाही बरसात झाली. पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या कोयना धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत होती. या बारा दिवसांत कोयनानगर येथे फक्त एकदाच पावसाने हजेरी लावली होती. तर बुधवारपासून गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेसह नवजा आणि महाबळेश्वरला चांगला पाऊस झाला.

कोयना येथे २५, नवजा १५ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ३७ मिलीमीटर पाऊस झाला. कोयना परिसरात आतापर्यंत ५४४२ मिलीमीटर पाऊस झाला असून, जिल्ह्यात सर्वाधिक ५९९३ मिलीमीटर पाऊस नवजा येथे नोंदविला गेला आहे. या पावसामुळे कोयना धरणात २२०८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर सिंचनासाठी ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीपातळी वेगाने खाली जाऊ लागली आहे. सध्या कोयना धरणात ९६.४३ टीएमसी इतका साठा आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागातही चांगला पाऊस होऊ लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत माण तालुक्यात २३, खटाव २६, फलटण ताुलक्यात २३, खंडाळ्यात ३० तर कोरेगाव तालुक्यात १८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी पाऊस खटाव तालुक्यात १२२ टक्के इतका झाला आहे. तर सर्वात कमी माण तालुक्यात ५७ टक्के नोंदला आहे. फलटण तालुक्यात ६० टक्के पाऊस झाला आहे. परतीच्या पावसावरच दुष्काळी तालुक्यातील रब्बी हंगामाचे चित्र अवलंबून असणार आहे.

Web Title: Satara: After ten days Mahabaleshwar, Navjala rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.