‘एस’ वळण ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ..! प्रवाशांची सुटका होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:27 PM2019-11-10T23:27:04+5:302019-11-10T23:28:22+5:30

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली.

 The 'S' turn is leading the way for travelers ..! | ‘एस’ वळण ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ..! प्रवाशांची सुटका होणार का?

पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्यानजीक असणारे तीव्र उताराचे अतिधोकादायक ‘एस’ वळण वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

Next
ठळक मुद्देपाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात; १०२ प्रवासी मृत्यू, २८२ जणांना कायमचे अपंगत्व

खंडाळा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्यानजीक असणारे तीव्र उताराचे अतिधोकादायक ‘एस’ वळण वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मानवी जीवाचा कर्दनकाळ ठरलेले हे वळण कायमस्वरुपी काढण्यासाठी जनतेतून अनेकदा उठाव झाला होता. शेकडो प्रवाशांचे प्राण गेल्यानंतर प्रशासनाने अखेर ‘एस’ वळण काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावर गेल्या दोन वर्षांत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे धोकादायक वळणाच्या विळख्यातून प्रवाशांची सुटका कधी होणार? हा प्रश्न अधांतरीच आहे.

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. दरम्यान, खंडाळा येथील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘एस’ वळण काढण्यासाठी ३९ खातेदारांचे सुमारे सव्वाचार एकर क्षेत्र नव्याने भूसंपादित करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातून जाणारा पुणे-बेंगलोर आशियाई महामार्ग तालुक्याच्या विकासाला दिशादर्शक ठरत असला तरी वाहनधारकांना व प्रवाशांना मृत्यूचा सापळाच ठरला आहे. याच महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेल्या ‘एस’ आकाराच्या वळणावर गत पाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात झाले असून, यामध्ये १०२ प्रवासी मयत तर सुमारे २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावरील पंढरपूर फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव उड्डाणपूल, खंबाटकीचा घाट व बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतरचे ‘एस’ वळण ही अपघाताची प्रमुख ठिकाणे आहेत. या अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही कायमस्वरुपी सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंडितपणे सुरूच आहे.

यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाचे हत्यार वेळोवेळी उपसले; परंतु त्यांच्या मागण्यांना केराची टोपली संबंधित विभागाकडून दाखवण्यात आली. खंबाटकी बोगदा ओलंडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर लोकांच्या जीविताशी खेळण्याचा खेळ सुरू असून, वळण काढले जात नाही आणि उपाययोजनाही केल्या जात नाहीत, त्यामुळे तालुकावासीय, वाहनधारक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याला अनुसरूनच तहसील कार्यालय खंडाळा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली ‘एस’ कॉर्नर काढण्याबाबत व नवीन रस्त्याच्या जमीन संपादनासाठी शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली होती.


अपघाताची मालिका सुरूच ...
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या ‘एस’ वळणाचा धोका अद्यापही कमी झाला नाही. बोगद्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारामुळे वाहनांची गती वाढत जाते, हे बºयाचदा चालकांच्या लक्षात येत नाही. पुढे अचानक ‘एस’ आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाºयास एक पाय गमवावा लागला होता. या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाली नाही, त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

खंबाटकी बोगदा आणि ‘एस’ वळणावर वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर नेहमीच तात्पुरती मलमपट्टी करीत असतात. कायमस्वरुपी उपाययोजना मार्गी लागली नसल्याने अद्यापही अपघात घडतात. तरीही याकडे डोळेझाकपणा केला जातोय. याबाबत नवीन बोगद्याचा मार्ग तारणहार ठरणार आहे; पण तो तातडीने व्हायला हवा.
- अजित यादव, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

 

Web Title:  The 'S' turn is leading the way for travelers ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.