लग्नसमारंभात नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:14+5:302021-05-09T04:41:14+5:30

व्यसनाधीनतेत वाढ सातारा : बेरोजगारी ओढवली असून, निराश झालेली तरुणाई हाताला काम नसल्याने त्यांच्यात व्यसनाधीनता वाढत आहे. जिल्ह्यातील पाटण, ...

Rule foot in the wedding ceremony | लग्नसमारंभात नियम पायदळी

लग्नसमारंभात नियम पायदळी

Next

व्यसनाधीनतेत वाढ

सातारा : बेरोजगारी ओढवली असून, निराश झालेली तरुणाई हाताला काम नसल्याने त्यांच्यात व्यसनाधीनता वाढत आहे. जिल्ह्यातील पाटण, जावली, माण, खटाव तालुक्‍यांतील बहुतांश नागरिक नोकरीसाठी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करत होते. मात्र, मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे आणि त्यांचे काम चांगले आहे. त्यांच्यावर बेरोजगारी आली आहे. शहरात राहणे परवडत नसल्याने लोक गावाकडे परतू लागले आहेत. त्यातून येणाऱ्या नैराश्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे.

ग्रेड सेपरेटरमधून उलटा प्रवास

सातारा : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी आहे. त्याचाच फायदा घेत येथील ग्रेड सेपरेटरमध्ये काही जण उलटा प्रवास करत आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शासकीय कर्मचारी तेवढेच रस्त्यावर दिसत आहेत, त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक रोडावली आहे. वाहने कमी असल्याने अनेक जण उलटसुलट प्रवास करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यासाठी नागरिकांनी संयम, शिस्त पाळायला हवी. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Rule foot in the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.