सांगलीत नियमांचे सर्रास उल्लंघन; संचारबंदीच्या नियमाला हरताळ- दुचाकीस्वार डबलसीट सुसाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:15 PM2020-06-01T12:15:01+5:302020-06-01T12:16:35+5:30

  सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी व त्याच्या नियमांचे शहरात सर्रास उल्लंघन सुरू आहे. ...

Rampant violation of Sangli rules; Strike the curfew rule | सांगलीत नियमांचे सर्रास उल्लंघन; संचारबंदीच्या नियमाला हरताळ- दुचाकीस्वार डबलसीट सुसाट!

सांगलीत नियमांचे सर्रास उल्लंघन; संचारबंदीच्या नियमाला हरताळ- दुचाकीस्वार डबलसीट सुसाट!

googlenewsNext
ठळक मुद्देत्यामुळे पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.

 

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी व त्याच्या नियमांचे शहरात सर्रास उल्लंघन सुरू आहे. दुचाकीवर डबलसीट फिरण्यासह चारचाकीमध्ये तीनपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवासास बंदी असताना, शहरात दुचाकीस्वार डबलसीट सुसाट जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चौका-चौकात पोलीस बंदोबस्त असतानाही कुणालाही हटकले जात नाही.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी करताना काही नियम शिथिल करण्यात आले होते, तर काही नियम कायम ठेवण्यात आले होते. त्यानुसार दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीच्या प्रवासास परवानगी देण्यात आली होती, तर चारचाकी वाहनातून चालकासह दोन व्यक्तींना परवानगी होती. शिवाय मास्कचा वापर करणे बंधनकारक होते.

सुरुवातीचे काही दिवस दुचाकीवर डबलसीट फिरणाºयांवर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली होती. त्यांना नोटिसा बजावून दंडाचीही वसुली केली जात होती. मात्र, या कारवाईतच आता शिथिलता आली असून, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या समोरून दुचाकीस्वार डबलसीट सुसाटपणे जात आहे.

वाहन घेऊन शहरात फिरताना विनाकारण फिरू नये व कामासाठीच घराबाहेर फिरण्याविषयीही आवाहन करण्यात आले असताना, अनेक तरुण दुचाकीवरून केवळ फेरफटका मारताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.
 

मास्कचा वापर नाहीच
दुचाकीवर फिरताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरही बंदी असताना याचे पालन होताना दिसत नाही. मास्कचा वापर न केल्याबद्दल सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या असल्या तरी, सध्या बहुतांश दुचाकीस्वार विनामास्क फिरत आहेत, तर दुचाकीवरूनच रस्त्यावर थुंकणाºयांचेही प्रमाण वाढले आहे. 

Web Title: Rampant violation of Sangli rules; Strike the curfew rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.