भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:07 PM2021-07-28T17:07:45+5:302021-07-28T17:09:13+5:30

Bjp GopichandPadalakar Satara : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

Public Interest Litigation against Padalkar: Hemant Patil | भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिका : हेमंत पाटील

Next
ठळक मुद्देभाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जनहित याचिकाइंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली माहिती

सातारा : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

गोपीचंद पडळकर यांनी मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे व सोलापूर येथे सभेत रात्र गेली हिशोबात पोरग॔ नाही नशिबात, असे अश्लील व अभद्र वक्तव्य करुन आपली प्रसिद्धी करुन घेतली.

मात्र यामुळे शरद पवार यांची बदनामी झाली आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाच्या निदर्शनास हेमंत पाटील यांनी आणून दिले आहे. कलम १२० बी, १५९ , १४६ आणि ५०० आयपीसीप्रमाणे गुन्हे दाखल करुन पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत पडळकर यानी शरद पवार यांच्या विरोधात कोणतेही अपशब्द वापरु नये, असे जनहित याचिकेत म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर हे सतत शरद पवार यांच्या विरोधात काहीही बोलून आपली लायकी घालवत असतात. नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांचा राजकीय सल्ला घेत असतात. भाजपाचे केंद्रीय मंत्री बारामतीतील विकास कामे पाहणीसाठी बारामतीचा दौरा करत असतात, त्यामुळे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना अशी वक्तव्य करणे शोभत नाही, असे हेमंत पाटील म्हणाले.

Web Title: Public Interest Litigation against Padalkar: Hemant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app