पावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीज, वाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:13 AM2020-06-23T11:13:29+5:302020-06-23T11:16:20+5:30

सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

Proposed four months in the rain village | पावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीज, वाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक

चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

Next
ठळक मुद्देपावसाच्या गावी चार महिन्यांची तजवीजवाहनांअभावी डोक्यावरून वाहतूक, धान्य अन् जीवनावश्यक वस्तूंचा साठा

लक्ष्मण गोरे 

बामणोली : सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर तसेच सातारा व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त पडतो. काही दिवस वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होते. डोंगरावर राहणारे तसेच नदीपलीकडील अनेक गावातील लोकांना बाजारहाट करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे चार महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा लोक करून ठेवतात. वाहनांअभावी डोक्यावरून घेऊन जावे लागते.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून ते सप्टेंबर ही चार महिने अति पावसाचे असतात. मान्सून सुरू झाला की दळणवळण व संपर्काची यंत्रणा ठप्प होतात. जावळी तालुक्यातील देऊर, वेळे, तळदेव मायणी, कारगाव तसेच नदीपलीकडील आडोशी, कुसापूर शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील पर्वत, चकदेव, कांदाट अशी गावे अतिदुर्गम आहेत.

या गावांसह डोंगरावर राहणाऱ्या अनेक गावातील लोकांना वाहतुकीसाठी असणारा कच्चा रस्ता पावसात बंद असतो. अशा ठिकाणचे ग्रामस्थ साखर, मीठ, कांदे, बटाटे, खते भिजून खराब होणाऱ्या वस्तूंसह धान्य, डाळी, कपडे याखेरीज पुरेशा रोख रक्कमेचीही तजवीज पावसाळ्यापूर्वीच करून ठेवतात. पावसाळ्यात चार महिने संततधार पाऊस कोसळत असतो.

पावसाळ्यात घरांना गळती लागू नये म्हणून येथील कौलारू तसेच मातीची असणारी घरे प्लास्टिक कागद तसेच कोळंबाने शेकारतात. या गवतामुळे घरात पावसाचे पाणीही येत नाही. शिवाय ऊबदारपणा टिकून राहण्यास मदत होते. घरांची डागडुजी उन्हाळ्यातच सुरू असते.

जनावरांची वैरण अन् सरपण पोटमाळ्यावर

तापोळा, बामणोली विभागातील अनेक गावे उंच, दुर्गम ठिकाणी डोंगरात वसलेली आहेत. या ठिकाणी दाट धुके व संततधार पाऊस असतो. अशा वेळी पाळीव जनावरांसाठीचा कोरडा चारा घरातील पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला असतो. तसेच स्वयंपासाठीची जळावू लाकडेही घरातील पोटमाळ्यावर किंवा एका स्वतंत्र खोलीत साठा करून ठेवली जातात.


लॉकडाऊनमुळे यंदा चाकरमानी गावालाच आहेत. नदीपलीकडील गावांना लाँच बंद तसेच लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने अनेक ग्रामस्थांना पावसाळ्यातील अन्नधान्यसाठा करता आला नाही.
- शिवराम चव्हाण,
लामज, ता. महाबळेश्वर


पावसाळ्याचा धान्यसाठा तळदेव ग्रामस्थांनी सातारा येथे खरेदी करून ठोसेघर पठारापर्यंत वाहतूक करून तेथून डोंगरातून दीड तास डोक्यावरून घरापर्यंत नेला आहे. दरवर्षी कसरत करावी लागते.
- पांडुरंग पवार,
तळदेव, मायणी, ता. जावळी.


 

Web Title: Proposed four months in the rain village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.