जावलीत खासगी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:10 PM2021-04-14T16:10:00+5:302021-04-14T16:13:05+5:30

CoronaVIrus Education Satara : जावळी तालुक्यातील एका खासगी शाळेतील ११ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली. दहावीत शिकणारे विद्यार्थी बाधित आढळल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Private school student coronated in Jawali | जावलीत खासगी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित

जावलीत खासगी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देजावलीत खासगी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित दहावीतील ११ विद्यार्थ्यांचा समावेश

कुडाळ : जावळी तालुक्यातील एका खासगी शाळेतील ११ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली. दहावीत शिकणारे विद्यार्थी बाधित आढळल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, या शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू होती. अशातच एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल बाधित आला.

यामुळे शाळा व्यवस्थापननाने तत्काळ याची दखल घेऊन शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली. यामध्ये ११ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले. यानंतर, शाळा व्यवस्थापनाने तत्काळ शाळा बंद केली असून, आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

 

Web Title: Private school student coronated in Jawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.