शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंपाला हात मारणार; पाणी नाही तर अ‍ॅक्टिंग सोडणार अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी: वेळू ग्रामस्थांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:33 IST

रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेची जिल्ह्यात जोरदार तयारी, अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी

 रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली. महाराष्ट्र पाणीदार करण्याचे तुमचे-आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळूकरांची शेवटपर्यंत साथ हवी आहे,’ असे भावनिक आवाहन अभिनेते अमीर खान यांनी केले.कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे वडजाई देवी मंदिरात पाणी फाउंडेशन आयोजित परिसंवादात अमीर खान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी डॉ. अविनाश पोळ, स्वाती भटकळ, सरपंच लक्ष्मीबाई भोसले, सतीश भोसले, माजी सरपंच लहुराज भोसले, सुखदेव भोसले, शरद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.अमीर खान पुढे म्हणाले, ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू केली तेव्हा या स्पर्धेमध्ये लोक सहभागी होतील का ? आम्ही जे सांगतोय ते योग्य आहे का ? ग्रामस्थ यामध्ये काम करतील का ? असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले होते. या स्पर्धेत वेळू गाव सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकदीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी दिली. तुम्हीच वेळ दिला, मेहनत घेतली. त्यामुळे वेळू गावाचा पाणी प्रश्न सुटला, ही फार मोठी गोष्ट आहे. या गावाकडे बघून इतर गावांना प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही इतर गावांना या कामाबाबत माहिती द्या.’दरम्यान, प्रास्ताविकांमध्ये दुर्योधन ननावरे यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये गाव सहभागी झाल्याने दोनच वर्षांत गावाचा कायापालट झाला आहे. तसेच गाव टँकरमुक्त झाले आहे, असे सांगितले.त्यावेळी मी थोडासा घाबरलो होतो : खान‘डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण वेळू गावामधील एका हातपंपावर झाले. हातपंपाला एकच हात मारणार, जर पाणी नाही आले तर मी अ‍ॅक्टिंग सोडणार, असा माझा डायलॉग होता. त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो. जर पाणी नाही आले तर... माझ्या अ‍ॅक्टिंगच काय ? असा प्रश्न पडला. परंतु वेळूमध्ये चांगलं काम झाल्यामुळे पाणी निश्चितपणे येणार, असा विश्वास होता. त्यामुळेच मी एक हात मारला अन् हातपंपातून पाणी बाहेर आले,’ अशी माहिती अमीर खान यांनी परिसंवादादरम्यान ग्रामस्थांना दिली.घास उगाना है....पेड लगाना है !पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळू गाव पाणीदार झाले आहे. आणखी पाणलोटचे काम करायचे आहे. मात्र, याबरोबरच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मातीचा कस वाढवायचा आहे. या मातीमध्येच पाण्याच्या उपलब्धतेनुसार घास उगाना है, पेड लगाना है ! ही सर्व कामे केल्यानंतर गाव एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचणार असल्याचे अमीर खान यांनी सांगितले.कोरेगाव तालुक्यातील वेळूतील याच हातपंपावर अमीर खान यांच्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण झाले. यावेळी अमीर खान यांनी एकदाच पंप मारताच पाणी आले.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसर