स्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:52 PM2020-01-23T18:52:43+5:302020-01-23T18:53:12+5:30

केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन फेºयांमध्ये पालिकेने देशभरात मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे.

Over six thousand responses to the Clean Survey | स्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर

स्वच्छ सर्वेक्षणात सहा हजारांहून अधिक प्रतिसाद : रहिमतपूर आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्दे पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे बारा पथके मैदानात

रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेतील ‘सिटीझन फिडबॅक’मध्ये आघाडी घेतली आहे. पालिकेने आपले सर्व पदाधिकारी व कर्मचा-यांचे बारा पथके मैदानात उतरवून गृहभेटी देत आहेत. फिडबॅक घेण्यावर भर दिला आहे. पालिकेने फिडबॅकमध्ये ६ हजार ५३५ च्या पुढे झेप घेतली आहे.

केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन फेºयांमध्ये पालिकेने देशभरात मुसंडी मारली असल्याचे दिसून आले आहे. आता मोहिमेच्या अंतिम लढाईसाठी पालिका पदाधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत.

रहिमतपूरमधील प्रत्येक वस्ती, गल्ली, चौक, रस्ते, शाळा व महाविद्यालय परिसर यासह घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत नागरिकांच्याकडून फिडबॅक घेण्यासाठी बारा पथके तयार केले आहेत. ही पथके सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत नागरिकांकडून प्रतिक्रिया नोंदवून घेण्याचे काम करत आहे. प्रत्येक पथकाला एक हजार फिडबॅक देण्याचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे. दि. ३१ मार्च अखेर उद्दिष्ठ पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांची फिडबॅक घेण्यासाठी शहरभर भिरकिट सुरू आहे.

कर्मचा-यांना बरोबर घेऊन या कामात नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकाही अगदी हिरीरीने सहभागी झाले आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत शहरात ६ हजार ५३५ लोकांचा फिडबॅक घेण्यात आला आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार त्याची टक्केवारी ३५.१४ आहे. फिडबॅकची टक्केवारी वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.

 

रहिमतपूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटीझन फिडबॅकमध्ये सध्या पश्चिम भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ही आघाडी कायमपर्यंत राहावी, यासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने व पंचक्रोशी संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धपणे कामकाज सुरू आहे. पदाधिकारी, कर्मचारी व शहरवासीय स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेसाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
- आनंदा कोरे, नगराध्यक्ष, रहिमतपूर

 

Web Title: Over six thousand responses to the Clean Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.