वाई नगर परिषदेच्या अंदाजपत्रक मंजुरीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:54+5:302021-03-06T04:37:54+5:30

वाई : पालिकेचे २०२०-२१चे दुरुस्ती अंदाजपत्रकासह मुख्याधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार २०२१-२२ मधील सुधारित अंदाजपत्रक तयार करताना नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व ...

Opposition to Y Municipal Council budget approval | वाई नगर परिषदेच्या अंदाजपत्रक मंजुरीस विरोध

वाई नगर परिषदेच्या अंदाजपत्रक मंजुरीस विरोध

Next

वाई : पालिकेचे २०२०-२१चे दुरुस्ती अंदाजपत्रकासह मुख्याधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार २०२१-२२ मधील सुधारित अंदाजपत्रक तयार करताना नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व प्रशासनाने नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. कोणत्याही चर्चेविना तसेच जनहिताचा अनादर करीत घाईगडबडीत सादर केलेल्या अंदाजपत्रकात त्रुटी आहेत. सर्वसमावेशक चर्चा व्हावी यासाठी उपनगराध्यक्ष अनिल सांवत यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाई नगर परिषदेचा अर्थसंकल्प हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने आत्मा समजला जातो. त्याअनुषंगाने अंदाजपत्रकात प्रत्येक विभागनिहाय जमा-खर्चाचे स्वतंत्र अंदाजपत्रक असणे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी विकासकामे व आकस्मित खर्चासाठी विभागवार तरतुदींची माहिती अंदाजपत्रकात असणे अपेक्षित असते. वाई नगर परिषदेत प्रत्यक्ष जमा रक्कम एकत्रितपणे नगरपालिकेच्या निधीतून घेऊन महसुली व भांडवली जमा रकमाचा एकत्रित समावेश करून अर्थसंकल्पाचा गाभाच निकामी होताना दिसत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली आहे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंदाजपत्रकात कुठल्या प्रकारची भरीव तरतूद न करता नगराध्यक्षा व प्रशासनाने कोरोनासारख्या भयावह आजाराकडे जाणीवपूर्वक दु्र्लक्ष केले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात खर्चाच्या तरतुदी नसताना करोडो रुपये खर्च केले आहेत. परिणामी नगर परिषद आर्थिक अडचणीला सामोरी जात आहे. नगर परिषदेत वार्षिक ठेक्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या कामकाजासंदर्भात केलेल्या खर्चाच्या तरतुदी अंदाजपत्रकामध्ये दिसून येत नाहीत. विभागवार महसुली जमा होणारी रक्कम त्याच विभागात खर्च करावी लागते. परंतु अशाप्रकारे जमा होणाऱ्या महसुली निधीचा विनियोग चुकीचा मांडून अंदाजपत्रकातील माहिती तसेच नगर परिषदेला देय असलेल्या गाळेधारकांचे अनामत रक्कम, निविदा अनामत, ठेकेदारांच्या बयाणा रक्कमा, शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या स्वनिधी रकमा यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असताना नगराध्यक्षा व प्रशासनाने कोणत्याही सदस्याला विचारात घेतले नाही.

यावेळी उपाध्यक्ष अनिल सावंत व त्यांचे सहकारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गटनेते भारत खामकर, संग्राम पवार, किशोर बागुल, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, राजेश गुरव, दीपक ओसवाल, ॲड.श्रीकांत चव्हाण, कांताराम जाधव, सीमा नायकवडी, स्मिता हगीर, शीतल शिंदे, रेश्मा जायगुडे, प्रियांका डोंगरे, आरती कांबळे आदींनी दिले आहे.

Web Title: Opposition to Y Municipal Council budget approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.