जेसीबी चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:59 PM2019-09-02T15:59:13+5:302019-09-02T15:59:59+5:30

वाई येथून जेसीबी चोरून पुण्याला घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने एकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

One of JCB thieves arrested | जेसीबी चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटक

जेसीबी चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटक

Next
ठळक मुद्देजेसीबी चोरणाऱ्या टोळीतील एकाला अटकदहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल जप्त

सातारा : वाई येथून जेसीबी चोरून पुण्याला घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने एकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दहा लाखांचा जेसीबी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

तेजस शिवाजी कुंभार (वय २७, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथून एक व्यक्ती जेसीबी चोरून पुण्याला जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खंडाळा येथे महामार्गावर सापळा रचला.

त्यावेळी तेजस कुंभार हा जेसीबी घेऊन येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ असलेला जेसीबी चोरीचा असल्याचे पुढे आले. त्याचे आणखी साथीदार असून, ते फरार आहेत. कुंभार याला पुढील तपासासाठी वाई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले आदींनी केली.

Web Title: One of JCB thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.