जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५० हजार पार, नवीन २२४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:44 AM2020-11-24T11:44:54+5:302020-11-24T11:47:16+5:30

coronavirus, satara #Hospital सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळू-हळू वाढत असून सोमवारी नवीन २२४ रुग्णांची नोंद झाली. यामुळे बाधित आकडा ५०१०३ झाला. तर कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १६८३ झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या ४९ जणांनी घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४७१२२ मुक्त झाले आहेत.

The number of victims in the district has crossed 50,000 | जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५० हजार पार, नवीन २२४ रुग्ण

जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५० हजार पार, नवीन २२४ रुग्ण

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५० हजार पार, नवीन २२४ रुग्ण कोरोनाने दोघांचा मृत्यू; बळींचा आकडा १६८३

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळू-हळू वाढत असून सोमवारी नवीन २२४ रुग्णांची नोंद झाली. यामुळे बाधित आकडा ५०१०३ झाला. तर कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १६८३ झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या ४९ जणांनी घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४७१२२ मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधित वाढत आहेत. रात्रीच्या अहवालानुसार १४७ नागरिकांचे अहवाल बाधित आले. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील खंडोबाचीवाडी, जकातवाडी, पोगरवाडी, भरतगाववाडी, शिवथर, वेणेगाव, कोंडवे, अतित आदी गावांत नवीन रुग्ण निष्पन्न झाले.

कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी, सैदापूर, उंब्रज येथे तर पाटण तालुक्यात पाटण, कोयनानगर, मोरगिरीत रुग्ण स्पष्ट झाले. फलटण तालुक्यातही फलटण, होळ, तरडगाव, विडणी साखरवाडी, सुरवडी, सोमंथळी, कोळकी आदी गावांत रुग्ण निष्पन्न झाले.

खटाव तालुक्यातील वेटणे, सातेवाडी, औंध, मायणी, पुसेगाव येथे, माण तालुक्यात गोंदवले, पळशी, मलवडी, विरळी, म्हसवड आदी गावांत तसेच कोरेगाव, जावळी, वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन रुग्णांची नोंद झाली.

मृत सातारा अन् कऱ्हाड तालुक्यातील...

जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातील हे मृत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात देगाव (ता. सातारा) येथील ६२ वर्षीय महिला तसेच खासगी रुग्णालयात कऱ्हाड तालुक्यातील ओगलेवाडी येथील ८२ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

३४९ जणांचे नमुने तपासणीला...

जिल्ह्यातून दिवसभरात ३४९ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून २८, कऱ्हाड २१, फलटण २४, कोरेगाव ३१, वाई ३६, खंडाळा २८, रायगाव १, पानमळेवाडी येथील ६, मायणी १८, महाबळेश्वर २५, पाटण ९, दहिवडी २२, खावली येथील ५, तळमावले २०, म्हसवड १५ वकऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ६० असे एकूण ३४९ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

Web Title: The number of victims in the district has crossed 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.