जिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर, नवे ४९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:25 PM2020-07-01T13:25:42+5:302020-07-01T13:27:46+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ४९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा १०९४ तर बळींचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. दरम्यान, २९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

The number of victims in the district is at eleven hundred | जिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर, नवे ४९ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर, नवे ४९ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर एका बाधिताचा मृत्यू : २९८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ४९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा १०९४ तर बळींचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. दरम्यान, २९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात गत दोन महिन्यांपेक्षा कोरोना बाधितांची संख्या आता दुपटीने वाढू लागली आहे. रोज पन्नास ते सत्तर बाधित रुग्ण आढळून येत आहेत. महिनाभरापूर्वी कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वाधित होते. मात्र, हे प्रमाण आता कमी होऊन बाधितांचे प्रमाण वाढलेय.

कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील ३३ वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तो कोरोना बाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले होते. दरम्यान, कऱ्हाड तालुका तर कोरोनाचा पुन्हा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. बुधवारी कºहाड तालुक्यात २२ बाधित रुग्ण आढळून आले.

त्यामध्ये महारुगडेवाडीमधील २१ वर्षीय युवक आणि ४६ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिला, रुक्मिणी नगरातील ३९ वर्षीय पुरुष, तारुखमधील २२ वर्षीय युवक ५४, ३२,४०, ३५ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, ६० तसेच ४४ पुरुष, तुळसनमधील ३ वर्षाची बालिका, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठतील २२ आणि २६ वर्षीय युवक, २३ वर्षीय युवती,४५,७० वर्षीय महिला, ओंडमधील ३६ वर्षीय पुरुष त्याचबरोबर मलकापुरातील ३६, ३४ वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे.

पाटण तालुक्यातही नवे सात रुग्ण आढळून आले. नवसरीतील १७ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगा तसेच तसेच ३६ वर्षीय महिला, पालेकरवाडीमधील ५० वर्षीय पुरुष, सदा दाढोलीतील ११ वर्षीय मुलगा आणि २९ वर्षीय महिलेसह ४ वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

सातारा शहरातही आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवार पेठेतील ३९ वर्षीय पुरुषासह तालुक्यातील नागठाणेतील ४५ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर माण तालुक्यातील खडकी पाटोळेतील ६२ वर्षीय पुरुषासह खटाव तालुक्यातील निमसोडमधील ६८ वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील ७५ वर्षीय पुरुष, राजाचे कुर्लेतील ३३ वर्षीय पुरुषाचाही अवाहल कोरोना बाधित आलाय. तसेच कोरेगाव तालुक्यातील करंजखोपमधील ८ वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये सहाजण बाधित आढळून आले. त्यामध्ये २२ वर्षीय युवक, २४, ३२ आणि २५ वर्षीय युवक तसेच १९ वर्षीय युवती आणि ४९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. फलटण तालुक्यातील कुरवलीमधील ४ वर्षीय आणि कोरेगावधील ५ वर्षीय बालक, जाधववाडीतील ४३ वर्षीय पुरुष, आंदरुडमधील ३५ वर्षीय पुरुष, गुणवरेतील ५१ वर्षीय पुरुषासह जावळी तालुक्यातील मार्ली येथील ८२ वर्षीय वृद्धाचाही अहवाल कोरोना बाधित आलाय.

दरम्यान, पुणे तसेच कऱ्हाड मधील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २९८ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १०९४ बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ७४० जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर ४६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ३०७ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकर कक्षात उपचार सुरू आहेत.

संसर्गामुळे बाधितांचे प्रमाण वाढतेय..

पुणे, मुंबईहून प्रवास करून आलेल्या नागरिकांमुळे आत्तापर्यंत बाधितांचे प्रमाण वाढत होते. मात्र सध्या यालट परिस्थिती असून, प्रवास करून आलेल्यांपेक्षा स्थानिक रहिवाशांमधील संसर्गामुळेच बाधितांचे प्रमाण वाढू लागल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास येत आहे. बुधवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये ३७ निकट सहवासित, प्रवास करुन आलेले ५, सारीच्या आजाराचे ५, व अन्य १ एकाचा समावेश आहे.

Web Title: The number of victims in the district is at eleven hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.