Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 02:55 PM2020-06-09T14:55:12+5:302020-06-09T14:57:32+5:30

नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.

Nature's companion came out after the lockdown, only the man changed | Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदलला

Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदलला

Next
ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदललाअन्नसाखळीतील खेकडे, बेडूक अन् जळू दिवाळीपासून होते नैसर्गिक अधिवासात

लक्ष्मण गोरे

बामणोली : नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.

खेकडे व जळू हे पावसाळा संपल्यावर पूर्णपणे गायब होत असतात. मग हे प्राणी कोठे राहतात, असा प्रश्न पडतो. खेकडे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ओढे, ओहोळेतील दगडाखाली दूरवर जमिनीत खोल बीळ करून राहतात. मान्सून सुरू होताच ते पुन्हा बाहेर येतात.

खेकड्यांमध्ये तांबडे खेकडे व काळे खेकडे असे दोन प्रकार असतात. तांबडे खेकडे हे उंचीवरील प्रदेशात म्हणजेच जांभा दगड असणारे महाबळेश्वर, कास पठार, ठोसेघर परिसरात आढळतात. काळे खेकडे सपाट सखल प्रदेशात म्हणजेच काळा दगड असणाऱ्या तापोळा, बामणोली, सातारा, परळी, कऱ्हाड अशा ओढे नदीकाठी आढळतात.

या खेकड्यांच्या मादी या पावसाळा सुरू होताच कवचातील पिल्ले पाण्यात वाढीसाठी सोडतात. त्यांनी या पिल्लांची निर्मिती उन्हाळ्यात करून ठेवलेली असते. खेकड्यांसोबत प्रकट होणारा जळू कीटक आहे. जळू माणूस व जंगली प्राणी, जनावरांचे रक्त पितो. माणसांच्या पायाला चावून अशुद्ध रक्त पितो. त्यामुळे अनेक पाश्चात्य वैद्यकीय उपचारांमध्ये जळू पकडून त्याद्वारे मेडिकल थेरपी केली जाते. रक्त पिलेल्या कित्येक पट रक्तस्त्राव त्या ठिकाणाहून होतो.

जळू ही दलदल असणाऱ्या ठिकाणी पालापाचोळा कुजलेल्या ठिकाणी आढळते. उन्हाळ्यात ती मृत अवस्थेत आढळते. वणवा गेला तरी जमिनीवरील गवत मात्र जळते; परंतु जळूला काहीही इजा होत नाही. पाऊस पडताच जळू लगेच जिवंत होते. भांबवली कासचा दलदलीचा परिसर, महाबळेश्वर, वासोटा, ठोसेघर या परिसरात जळू मोठ्या प्रमाणात आढळतात.

काही मानवी वस्त्याही अलिप्त

प्राण्यांप्रमाणेच काही गावे व मानवी वस्त्या आजही अलिप्त राहतात. जावळी तालुक्याच्या पश्चिमेकडील तळदेव मायणी व देऊर ही ठोसेघर पठाराला लागून असलेली दोन गावे तसेच मालदेव व रवदी मुरा येथील एका कुटुंबांची वस्ती वीज, रस्ता मोबाईल यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. निव्वळ पाणवठ्याची सोय असल्याने ही गावे अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करत आहेत.

Web Title: Nature's companion came out after the lockdown, only the man changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.