Karad Bus Accident: कराड जवळ नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २० फूट खड्ड्यात सहलीची बस कोसळली, ४५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:09 IST2025-12-02T10:05:09+5:302025-12-02T10:09:46+5:30
Satara Karad School Bus Accident: कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे.

Karad Bus Accident: कराड जवळ नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २० फूट खड्ड्यात सहलीची बस कोसळली, ४५ जण जखमी
कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करत होते, या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-बंगळुर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे सातारा ते कराड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यात वळणे आहेत. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स आहेत. रस्त्याच्या बाजूने खुदाईचे काम सुरू आहे. यामुळे दररोज अपघात होत आहेत.
जखमी विद्यार्थ्यांना कृष्णा हॉस्पीटलला हलवण्यात आले आहे. सहलीसाठी ४० ते ५० विद्यार्थी नाशिकमधून निघाले होते. या घटनेत ५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. चालकाचे नियंत्रण सूटून काम सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यात बस कोसळली . जखमींवर सद्या उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.