माझं लग्न का करत नाही म्हणून डोक्यात कुऱ्हाड घालून आईचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:16 PM2019-12-12T12:16:59+5:302019-12-12T12:22:19+5:30

‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुºहाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना  गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली.

Murder of a mother with an ax in the head | माझं लग्न का करत नाही म्हणून डोक्यात कुऱ्हाड घालून आईचा खून

माझं लग्न का करत नाही म्हणून डोक्यात कुऱ्हाड घालून आईचा खून

Next
ठळक मुद्देडोक्यात कुऱ्हाड घालून आईचा खूनखटाव तालुक्यातील मोराळे येथील घटना

 

सातारा : ‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुºहाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना  गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली.

कांताबाई शहाजी शिंदे (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किरण शहाजी शिंदे (वय २९) याचे लग्न ठरत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. ‘माझं लग्न कर,’ असे म्हणून तो आईच्या मागे तगादा लावत होता.

दरम्यान, वडील शहाजी शिंदे हे  गुरुवारी रात्री लघुशंकेसाठी झोपेतून उठले होते. घरात बाथरुम नसल्यामुळे ते घराबाहेर जात होते. याचवेळी मुलगा किरण शिंदे याने वडिलांच्या पाठीत लाथ मारून त्यांना घराबाहेर ढकलेले. त्यानंतर आतून कडी लावून घेतली. झोपेत असलेल्या आईला उठवून त्याने ‘तू माझं लग्न का करत नाहीस व मला नेहमी काम का सांगतेस,’ असे म्हणत  वाद घालण्यास सुरूवात केली.

संतापाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता किरणने आईच्या डोक्यात कुºहाडीने घाव घेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आतून दरवाजाची कडी उघडत नसल्याने वडिलांनी शेजाºयांना उठवले. त्यानंतर दरवाजा तोडून नागरिकांनी घरात प्रवेश केला.

पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीसही तत्काळ घटनास्थळी पोहोचले.  कुºहाडीसह किरणला पोलिसांनी ताब्यात घेतले. जन्मदात्या आईचाच मुलाने खून केल्याने खटाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. मुलावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Murder of a mother with an ax in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.