मलकापूर पालिकेने स्वीकारले पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे दायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:07+5:302021-05-13T04:39:07+5:30

मलकापूर : कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राटी पध्दतीसह विविध पर्याय शोधत असतानाच पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे मलकापूर पालिकेने दायित्व स्वीकारले ...

Malkapur Municipality accepts responsibility of Pachwadeshwar Kovid Cemetery | मलकापूर पालिकेने स्वीकारले पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे दायित्व

मलकापूर पालिकेने स्वीकारले पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे दायित्व

Next

मलकापूर : कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राटी पध्दतीसह विविध पर्याय शोधत असतानाच पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे मलकापूर पालिकेने दायित्व स्वीकारले आहे. मलकापूर शहर, काले पीएचसी व येवती पीएचसीअंतर्गत ४१ गावांसह कृष्णा रुग्णालय, क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटरमधील कोविडबाधित मृतदेहांवर अंत्यविधीची विनामूल्य सोय केली आहे. या कोविड स्मशानभूमीत पालिकेच्या कोरोना योध्द्यांनी सात महिन्यात ९५, तर चाळीस दिवसात ९२ अशा १८७ मृतदेहांना सन्मानाने निरोप दिला आहे.

कोविड बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कराड पालिका एकमेव पर्याय होता. अंत्यविधीचा वाढता ताण विचारात घेता शासनाने मलकापूर पालिकेला संधी दिली होती. पाचवडेश्वर येथील स्मशानभूमीत १ महिन्यापूर्वी ११ सप्टेंबरला अंत्यविधीस सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे असलेले कृष्णा रुग्णालय मलकापुरात असल्यामुळे तुलनेने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांवर उपचारही याच रुग्णालयात होतात. दिवसेंदिवस गावोगावी बाधितांची संख्या वाढतच गेली. त्याच प्रमाणात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. कृष्णा रुग्णालयात मृत्यू झालेल्या कोणत्याही गावचा मृतदेह असला तरी याच स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. त्याचबरोबर क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटर, वारणा कोविड सेंटरसह काले १६ व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ अशा ४१ गावांचा समावेश आहे. त्या संधीचे सोने करत पालिकेने अंत्यविधीच्या खर्चासह कर्मचाऱ्यांची टीमच कार्यरत ठेवली आहे. पालिकेच्या कोविड योध्द्यांनी आठ महिन्यात तब्बल १८७ कोरोनाबाधित मृतदेहांवर विधीवत अंत्यविधी केले. ही सोय झाल्यामुळे अंत्यसंस्काराचे वेटिंग बंद झाले आहे.

चौकट :

मृतांची संख्या वाढतेय...

पाचवडेश्वर स्मशानभूमीत आठ महिन्यांपासून कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ११ सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात सर्वाधिक १९ कोरोनाबाधित मृतदेहावर, तर दुसऱ्या लाटेत १ मे रोजी ८ मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आला.

चौकट :

नऊ महिन्यांचा लेखाजोखा

सप्टेंबर - ३२२, ऑक्टोबर - ३८३, नोव्हेंबर - १६, डिसेंबर - ८५, जानेवारी - १६, फेब्रुवारी -०७. मार्च - ०८, एप्रिल - ४६९ मे महिन्यात १० दिवसात ४६

चौकट :

अंत्यविधीसाठी पालिकेचे कर्मचारीच शिलेदार

मलकापूर पालिकेतील आरोग्य विभागातील अमर तडाखे, यशंवत काटवटे, राहुल विरकायदे, रोहित काटवटे, अशिष कुरले, अरुण कुरले व कृष्णा दणाने हे शिलेदार पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देत आहेत. पालिकेसह शासनाने जबाबदारी दिलेल्या गावात कोरोनाने मृत्यू झालेल्या १८७ मृतदेहांवर विधीवत अंत्यसंस्कार केले आहेत.

चौकट :

रुग्णालयनिहाय कोरोनाबाधित मृतदेह

१* कृष्णा हाॅस्पिटल १६५, वारणा कोविड सेंटर १*, मलकापूर हद्दीमधील ८*, सवादे प्राथमिक आरोग्य केंद्र १, काले प्राथमिक आरोग्य केंद्र ३, क्रांती सर्जिकल आयसीयू ९, केवळ दहा दिवसात ४६ जणांचा मृत्यू. पहिल्या लाटेत ९५ मृतदेहांवर दुसऱ्या लाटेमध्ये दिनांक ५ एप्रिलपासून ९२ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या महिन्यात १० दिवसात ४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १*

मलकापूर पालिकेने स्वीकारले पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे दायित्व

सात महिन्यात ९५, तर चाळीस दिवसात ९२ अशा १८७ मृतदेहांवर विनामूल्य अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राटी पध्दतीसह विविध पर्याय शोधत असतानाच पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीचे मलकापूर पालिकेने दायित्व स्विकारले आहे. मलकापूर शहर, काले पीएचसी व येवती पीएचसी अंतर्गत ४१ गावांसह कृष्णा रूग्णालय, क्रांती सर्जीकल आयसीयू सेंटरमधील कोविडबाधित मृतदेहावर अंत्यविधीची विनामुल्य सोय केली आहे. या कोविड स्मशानभूमीत पालिकेच्या कोरोना योध्यांनी सात महिन्यात ९५ तर चाळीस दिवसात ९२ अशा १८७ मृतदेहाला सन्मानाने निरोप दिला आहे.

कोविड बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कराड पालिका एकमेव पर्याय होता. अंत्यविधीचा वाढता ताण विचारात घेता शासनाने मलकापूर पालिकेला संधी दिली होती. पाचवडेश्वर येथील स्मशानमीत १ महिन्यापूर्वी ११ सप्टेंबरला अंत्यविधिस सुरूवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे असलेले कृष्णा रूग्णालय मलकापूरात असल्यामुळे तुलनेने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांवर उपचारही याच रूग्णालयात होतात. दिवसेंदिवस गावोगावी बाधितांची संख्या वाढतच गेली त्याच प्रमाणात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. कृष्णा रूग्णालयात मृत्यू झालेल्या कोणत्याही गावचा मृतदेह असला तरी याच स्मशाणभुमीत अंत्यविधी केला जातो. त्याचबरोबर क्रांती सर्जिकल आयसीयू सेंटर, वारणा कोविड सेंटरसह काले १६ व येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ अशा ४१ गावांचा समावेश आहे. त्या संधीचे सोने करत पालिकेने अंत्यविधिच्या खर्चासह कर्मचाऱ्यांची टीमच कार्यरत ठेवली आहे. पालिकेच्या कोविड योध्यांनी आठ महिन्यात तब्बल १८७ कोरोनाबाधित मृतदेहावर विधिवत अंत्यविधी केले. ही सोय झाल्यामुळे अंत्यसंस्काराचे वेटिंग बंद झाले आहे.

चौकट :

मृतांची संख्या वाढतेय..

पाचवडेश्वर स्मशानभूमीत आठ महिन्यांपासून कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ११ सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात सर्वाधिक १९ कोरोनाबाधित मृतदेहावर तर दुसऱ्या लाटेत १ मे रोजी ८ मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आला.

चौकट :

नऊ महिन्याचा लेखाजोखा

सप्टेंबर - ३२२, आॕक्टोबर - ३८३, नोव्हेंबर - १६, डिसेंबर - ८५, जानेवारी - १६, फेब्रुवारी -०७). मार्च - ०८, एप्रिल - ४६९ मे महिन्यात १० दिवसात ४६

चौकट :

अंत्यविधीसाठी पालीकेचे कर्मचारीच शिलेदार

मलकापूर पालिकेतील आरोग्य विभागातील अमर तडाखे, यशंवत काटवटे, राहुल विरकायदे, रोहित काटवटे, अशिष कुरले, अरुण कुरले व कृष्णा दणाने हे शिलेदार पाचवडेश्वर कोविड स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देत आहेत. पालिकेसह शासनाने जबाबदारी दिलेल्या गावात कोरोनाने मृत्यू झालेल्या १८७ मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.

चौकट :

रूग्णालय निहाय कोरोनाबाधित मृतदेह

१* कृष्णा हाॅस्पीटल १६५, वारणा कोवीड सेंन्टर १*, मलकापुर हद्दीमधील ८*, सवादे प्राथमिक आरोग्य केंद्र १, काले प्राथमिक आरोग्य केंद्र ३, क्रांती सर्जिकल आयसीयू ९, केवळ दहा दिवसात ४६ जणांचा मृत्यू. पहिल्या लाटेत ९५ मृतदेहावर दुसऱ्या लाटेमध्ये दिनांक ५ एप्रिल पासून ९२ कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या महिन्यात १० दिवसात ४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Malkapur Municipality accepts responsibility of Pachwadeshwar Kovid Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.