रुग्णांसाठीची रेमडेसिविर इंजेक्शन्स चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:13+5:302021-05-15T04:38:13+5:30

सातारा : विनापरवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाणारा प्रशांत सावंत हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात ...

Investigations revealed that he was stealing remedivir injections for patients | रुग्णांसाठीची रेमडेसिविर इंजेक्शन्स चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न

रुग्णांसाठीची रेमडेसिविर इंजेक्शन्स चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न

Next

सातारा : विनापरवाना आणि मूळपेक्षा अधिक किमतीला रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन जाणारा प्रशांत सावंत हा रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची चोरी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे, तर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत रेमडेसिविरच्या १२ इंजेक्शन वायल हस्तगत केल्या असून, यामध्ये संबंधित रुग्णालयातील काही जण त्याला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या माहितीआधारे सोमवारी रात्री शहरातील समर्थ मंदिर परिसरात प्रशांत दिनकर सावंत (वय २९) आणि सपना प्रशांत सावंत (वय २५, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना विनापरवाना व मूळ विक्री किमतीपेक्षा अधिक दराने देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन जाताना पकडले होते. त्यानंतर याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करीत आहेत.

या तपासादरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शन विक्री केली आहे, असे साक्षीदारासमक्ष निष्पन्न झाले. यामध्ये सौरभ प्रकाश पवार (रा. खेड, सातारा) याने प्रशांत सावंत व सपना सावंत यांना रेमडेसिविर इंजेक्शन वायल विक्री करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली होती, तर या प्रकरणात आतापर्यंत पवार याच्याकडून ९ इंजेक्शन्स वायल जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे एकूण १२ इंजेक्शन वायल जप्त केल्या आहेत. याची किंमत ३५,४८० रुपये आहे.

चौकट :

प्रशांत सावंत सर्जिकल वॉर्डचा इन्चार्ज...

पोलिसांच्या तपासात प्रशांत सावंत हा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील एका रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डचा इन्चार्ज आहे. तो दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक, तसेच रुग्णालयाकडून मिळालेली रेमडेसिविरची ६ इंजेक्शन ताब्यात घ्यायचा. इंजेक्शनची एक वायल १०० एमएलची असते. पहिल्या दिवशी रुग्णाला दोन इंजेक्शन दिली जातात; पण सावंत हा रुग्णाला एक देऊन दुसरी स्पेअर करून ती घरी नेऊन ठेवत होता. त्यानंतर रुग्णाला उर्वरित देण्यात येणाऱ्या ४ रेमडेसिविर इंजेक्शन वायल एक दिवसाआड देऊन २ स्पेअर करीत असे, तसेच यामध्ये रुग्णालयातील काही स्टाफ सावंतला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Investigations revealed that he was stealing remedivir injections for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.