इतिहास दृष्टिक्षेपात : कऱ्हाडमध्ये आढळला शिवकालीन गद्धेगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:25 PM2021-04-23T12:25:33+5:302021-04-23T12:28:33+5:30

History Sarata Krarad : कऱ्हाड येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात शिवकालीन गद्धेगाळ शिल्प सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला आहे. हा गद्धेगाळ १६५३ मधील असून त्यावर मौजे सेगाव येथील जमीन दान दिल्याचा उल्लेख आढळतो.

History at a Glance: Shiva-era donkeys found in Karhad | इतिहास दृष्टिक्षेपात : कऱ्हाडमध्ये आढळला शिवकालीन गद्धेगाळ

कऱ्हाड येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात शिवकालीन गद्धेगाळ शिल्प आढळून आले आहे.

Next
ठळक मुद्दे इतिहास दृष्टिक्षेपात : कऱ्हाडमध्ये आढळला शिवकालीन गद्धेगाळमिरज इतिहास मंडळाच्या अभ्यासकांचे संशोधन

सातारा : कऱ्हाड येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात शिवकालीन गद्धेगाळ शिल्प सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. गौतम काटकर आणि मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला आहे. हा गद्धेगाळ १६५३ मधील असून त्यावर मौजे सेगाव येथील जमीन दान दिल्याचा उल्लेख आढळतो.

प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे कऱ्हाड परिसरात संशोधन करीत असताना त्यांना शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात गद्धेगाळ आढळून आला. तो उलटा करून जमिनीत पुरून ठेवला होता. हा गद्धेगाळ १२ ओळींचा असून, त्यावर सके १५७५ म्हणजेच १६५३ असा कालोल्लेख आहे.

मौजे सेगाऊ येथील जमीन दान दिली असून त्यावरील कर माफ केल्याचा हा उल्लेख आहे. या लेखाच्या शेवटी हे लिहिविल येणे न पाळी त्यास गडव असे शापवचन कोरले आहे. अक्षरवाटिका आणि भाषाशैली ही शिवकालीन आहे. बारा ओळींच्या मजकुराबरोबरच गाढव आणि एका व्यक्तीचे चित्र शिल्पांकित केले आहे, तर वरील बाजूस सूर्य-चंद्र कोरले आहेत.

श्री. शिवाजी विद्यालयाचे तत्कालीन इतिहास विषयाचे शिक्षक भगवानराव घारगे यांनी विद्यालयात पुरातन संग्रहालय केले होते. भाळवणी येथील ११७३ चा कलचुरी राजा रायमुरारी सोयीदेव यांचा कानडी लेख आणि यादव नृपती दुसरा सिंघण यांचा १२१६ मधील देवनागरी लेख येथे आहे. हे दोन्ही लेख अभ्यासक वि. भि. कोलते यांनी प्रसिद्ध केले आहेत. मात्र, त्या शेजारीच हा गद्धेगाळ होता.

तो आजवर अप्रकाशित होता. लवकरच या गद्धेगाळावरील लेखावर शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संशोधनासाठी श्री शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष जयंतराव काका पाटील, मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, सातारा येथील कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, डॉ. आर. बी. सातपुते यांचे सहकार्य लाभले.

गद्धेगाळ म्हणजे काय?

गद्धेगाळ ही शिलालेखांसारखीच लेखयुक्त शिल्पे असतात. शिलालेखांत लिहिलेले नियम, आज्ञा मोडू नये, नागरिकांनी त्याचे पालन करावे यासाठी शेवटी शापवचनासारखी काही वाक्ये लिहिली असतात. त्यामध्ये गाढवावरून दिलेली शिवी असते आणि या शिवीत लिहिल्याप्रमाणे गाढव आणि स्त्रीचे शिल्पांकनही केलेले असते.

प्रथमदर्शनी हे शिल्प आणि त्यावरील शिवीसदृश वाक्य हे अशिष्ट वाटले तरी त्यामागे केवळ शिवीगाळ करणे हा उद्देश नसतो, तर राजाज्ञा अथवा नियम मोडले तर कोणते परिणाम भोगावे लागतील, याचा इशारा देणारी ही वाक्ये असतात. असे गद्धेगाळ हे गावाच्या प्रमुख ठिकाणी ठेवलेले असतात.


 

Web Title: History at a Glance: Shiva-era donkeys found in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.