साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर, कोयनेत तीन टीएमसी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 01:06 PM2021-07-21T13:06:09+5:302021-07-21T13:07:38+5:30

Rain Satara : सातारा शहरासह पश्चिम भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० मिलीमीटरवर पर्जन्यमान नोंद झाले. तर कोयना धरणात २४ तासांत सवा तीन टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरणात ५७.३५ टीएमसी साठा झाला होता. सातारा शहरात तर बुधवारीही सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता.

Heavy rainfall in western part including Satara, three TMC increase in Koyna | साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर, कोयनेत तीन टीएमसी वाढ

साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर, कोयनेत तीन टीएमसी वाढ

Next
ठळक मुद्देसाताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर, कोयनेत तीन टीएमसी वाढ नवजा अन् महाबळेश्वरला दुसऱ्या दिवशीही १०० मिलीमीटरवर पर्जन्यमान

सातारा : सातारा शहरासह पश्चिम भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० मिलीमीटरवर पर्जन्यमान नोंद झाले. तर कोयना धरणात २४ तासांत सवा तीन टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरणात ५७.३५ टीएमसी साठा झाला होता. सातारा शहरात तर बुधवारीही सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता.

जिल्ह्यात दडी मारुन बसलेल्या पावसाला मागील १२ दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सुरुवातीच्या काही दिवसांत पश्चिम भागात रिमझिम स्वरुपात पाऊस पडत होता. त्यानंतर हळू हळू पाऊस जोर धरु लागला. यामुळे भात लागणीच्या कामाला वेग आला. तर गेल्या चार दिवसांपासून पावसाने आणखी जोर धरला आहे.

विशेष करुन पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, पाटण, कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे जोरदार वृष्टी होत आहे. तर साताऱ्यासह परिसरातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. पूर्व भागातही अधून मधून सरी पडत आहेत.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर १०९ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत १५१० मिलीमीटरची नोंद झाली आहे. नवजाला सकाळपर्यंत १४८ व यावर्षी आतापर्यंत २१२४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला १४० आणि जूनपासून आतापर्यंत २०८३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५७.३५ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात सवा तीन टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ३२२०७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

Web Title: Heavy rainfall in western part including Satara, three TMC increase in Koyna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.