कोरोनाचा कहर : फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 06:33 PM2021-04-19T18:33:03+5:302021-04-19T18:34:12+5:30

CoroanVirus Satara : फलटण तालुक्यात रविवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार ३६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने एवढे बाधित आढळल्याने कोरोनाचा कहर तालुक्यात वाढला आहे.

Havoc of corona: 363 new corona affected in Phaltan taluka | कोरोनाचा कहर : फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित

कोरोनाचा कहर : फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा कहर : फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फलटण : फलटण तालुक्यात रविवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार ३६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने एवढे बाधित आढळल्याने कोरोनाचा कहर तालुक्यात वाढला आहे.

फलटण तालुक्यातील फलटण ३४, पाचबत्ती चौक ६, सोमवार पेठ २, बुधवार पेठ ६ , मंगळवार पेठ ३ , शुक्रवार पेठ ९, रविवार पेठ ८, मलटण २१, लक्ष्मीनगर २२, सगुनामाता नगर ३, काळुबाईनगर ४, डी. ए. चौक ३, शिंदेनगर १, संत बापूदासनगर १, हिंगणगाव १६, सुरवडी १, विडणी ६, झिरपवाडी ५, जाधववाडी ६, कुसूर १, ठाकुरकी ५, सोनवडी ३, शिंदेवाडी २, गोळीबार मैदान ७, शेरेवाडी १, कोळकी १९, वाखरी ६, ताथवडा ८, दुधेबावी २, दालवडी १, विंचुर्णी २, अंबेघर १, ढवळ ३, मानेवाडी १, ढवळेवाडी ३, पिप्रंद ५, फरांदवाडी ६, खुंटे ३, अंबवडे खुर्द १, गोखळी १, शेरेशिंदेवाडी १, आसू ४, शिंदेवाडी खुंटे ४, निंभोरे ६, पाडेगाव ६, तांबवे ९, तरडगाव ३, सांगवी २, निंबळक १, तडवळे १, मुळीकवाडी ५, कुरवली २, चव्हाणवाडी १०, शिंदेमळा २, फडतरवाडी १, तावडी २, साखरवाडी ५, अरडगाव १, शेऱ्याचीवाडी ३, महतपुरा पेठ १, गिरवी नाका १, अलगुडेवाडी १, साखरवाडी १, बिरदेवनगर १, मलवडी बरकडेवस्ती १, टाकुबाईचीवाडी १, मिरगाव १, जिंती ५, चौधरवाडी २, सोनवडी १, कुरवली १, कापशी २, वाडले १, तिरकवाडी १, मिरढे २, आदर्की खुर्द १, पिंपळ मळा १, प्रहर १, गुणवरे १, वाजेगाव बरड १, बरड १, बरड २, गोखळी १, खराडेवाडी १, रावडी बुद्रुक १, पाडेगाव ८, वाजेगाव १, सुरवडी १, सरडे १, काळज १, सासकल भादळी १, नांदल १, निंबळक नाका १, सोमंथळी १, रिंगरोड १, घाडगेवाडी १, मलवडी १, वाठार निंबाळकर १, निंबळक १, घुले वस्ती १, गुणवरे १ असा एकूण ३६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

गरज असेल तर घराबाहेर पडा...

फलटण तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करून गरज असेल तरच घराबाहेर पडावे. घरीच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Havoc of corona: 363 new corona affected in Phaltan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.