कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:20 PM2020-09-17T17:20:16+5:302020-09-17T17:21:40+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Half TMC of water required to fill Koyna Dam | कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

Next
ठळक मुद्देकोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज विसर्ग करावा लागणार : पूर्व भागात पावसामुळे नुकसान

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तर सर्वत्र खरीप हंगामातील पेरण्यांनाही उरक आला. मात्र, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून पाऊस कमी झाला. जुलै महिन्यातही पाऊस कमीच राहिला. त्यामुळे धरणात वेगाने पाणीसाठा वाढला नाही. याच काळात पूर्व दुष्काळी भागात अधूनमधून चांगला पाऊस होत गेला. त्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली.

जुलै महिन्यांत पावसाने ओढ दिली असलीतरी आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतर दमदार पाऊस पडू लागला. यामुळे मोठ्या धरणामध्ये वेगाने पाणीसाठा वाढला. परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला. तरीही मागीलवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

सध्या धरण क्षेत्रात पाऊस अत्यल्प होत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे अवघा २ तर यावर्षी आतापर्यंत ४२४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे धरण भरण्यासाठी अजनू अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद आहे. धरण भरल्यानंतर पाण्याची आवक पाहून पायथा विजगृह व दरवाजातून विसर्ग करावा लागणार आहे, असे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. नवजा येथे सकाळपर्यंत १८ आणि जूनपासून ४८८५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वला सकाळपर्यंत ९ व यावर्षी आतापर्यंत ४८६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बाजरी, सोयाबीन, बटाट्याचे नुकसान...

पूर्व दुष्काळी भागात दमदार पाऊस पडत आहे. बुधवारी सायंकाळपासून मान, खटाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, घेवडा, बटाटा, सोयाबीन अशा पिकांना चांगलाच फटका बसलाय. यामुळे बळीराजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक काढणी वेळीच पाऊस येत असल्याने नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Half TMC of water required to fill Koyna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.