घायाळ राष्ट्रवादीला युद्धाचे आव्हान, बारामती, फलटणवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:04 PM2019-06-19T16:04:04+5:302019-06-19T16:07:35+5:30

लोकसभेच्या रणांगणात घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी खिंडीत पकडले आहे. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी अध्यादेश काढून रोखण्यात आलंय. माढा मतदार संघात पराभवामुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादीला नामोहरम करून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे, यासाठी काँगे्रसच्या अस्वस्थ नेत्यांना रसद पुरविण्यात आलीय.

 Ghayal Challenged the war of NCP, Baramati, Phaltan | घायाळ राष्ट्रवादीला युद्धाचे आव्हान, बारामती, फलटणवर टीकास्त्र

घायाळ राष्ट्रवादीला युद्धाचे आव्हान, बारामती, फलटणवर टीकास्त्र

Next
ठळक मुद्दे घायाळ राष्ट्रवादीला युद्धाचे आव्हान, बारामती, फलटणवर टीकास्त्र : विधानसभेपूर्वी पाण्याच्या राजकारणाने घेतला पेट

सागर गुजर 

सातारा : लोकसभेच्या रणांगणात घायाळ झालेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी खिंडीत पकडले आहे. नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी अध्यादेश काढून रोखण्यात आलंय. माढा मतदार संघात पराभवामुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादीला नामोहरम करून सातारा जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे, यासाठी काँगे्रसच्या अस्वस्थ नेत्यांना रसद पुरविण्यात आलीय.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा या पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. काँगे्रसशी मतभेद झाल्याने राष्ट्रवादी काँगे्रसची निर्मिती झाली. सुरुवातीच्या काळात काँगे्रस हाच राष्ट्रवादीचा प्रबळ विरोधक होता. जिल्ह्यामध्ये ताकद वाढवित असताना राष्ट्रवादीने काँगे्रसच्या शक्तिस्थळांवर वार केले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँगे्रस अशीच लढत झाली. गेल्या २० वर्षांच्या काळात राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांत झटापटी झाल्या. त्यामध्ये काँगे्रस पुरती नामोहरम झाली. काँगे्रसच्या ताब्यातील अनेक संस्था राष्ट्रवादीच्या नावावर झाल्या. जिल्हा परिषदेतील काँगे्रसचे संख्याबळ घटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका या राष्ट्रवादी विरुद्ध काँगे्रस अशाच झाल्या.

एका बाजूला राष्ट्रवादीने सातारा आपला बालेकिल्ला केला तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठांच्या आदेशाने निवडणुकांमध्ये आघाडीधर्म पाळण्याची वेळ काँगे्रस नेत्यांवर आली. या परिस्थितीत काँगे्रस नेत्यांचा कोंडमारा झाला.

तोंड दाबून बुक्क्यांचा मारह्ण सोसणाऱ्या काँगे्रस नेत्यांनी आता राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली आहे. या राजकीय उलथापालथीत केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने राजकीय डावपेच आखले आहेत. राष्ट्रवादीशी समोरासमोर लढून विजय मिळविता येणार नाही, हे लक्षात घेऊन काँगे्रसमधील अस्वस्थ नेतेमंडळींना खतपाणी घालून राष्ट्रवादीला घायाळ करण्याची जोरदार खेळी भाजपने खेळलीय.

माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष, त्यांना भाजपमध्ये घेतले. त्यांचा प्रचार काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला. वाईचे माजी आमदार व काँगे्रसचे नेते मदन भोसले यांनाही भाजपमध्ये घेण्यात आले. आणखी काही मंडळी विधानसभा निवडणुकीआधी भाजपच्या कळपात जाण्याची शक्यता आहे. भाजपची ही खेळी शांतपणे सुरू असली तरी राष्ट्रवादीमध्ये मात्र अस्वस्थता आहे.

आता आघाडी शासनाच्या काळात तयार झालेल्या पाणी योजनांचा जिल्ह्याला फायदाच होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सातारकरांची अस्मिता जागृत करण्यावर ह्यराष्ट्रवादीह्णच्या विरोधकांनी भर दिलाय. खंडाळा, फलटण, कऱ्हाड , माण, खटाव या तालुक्यांना डावलून पाणी सांगली, सोलापूर, बारामतीला पळविण्यात आल्याच्या मुद्द्याला बुस्टर डोस देण्यात आलाय. राज्य शासनाने नुकताच अध्यादेश काढून नीरा-देवघरमधून बारामतीला जाणारे पाणी रोखले. राष्ट्रवादीला चक्रव्यूहात गुंतवण्यासाठी सुरू असलेल्या खेळ्यांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळेच रंग भरत आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर होणाºया आरोपांना तोंड देण्यासाठी पक्षातील एकही नेता पुढे आलेला नाही, हेच विशेष! राष्ट्रवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत उदयनराजे आणि रामराजे यांच्यात भलतीच कळवंड उडाली. पक्षाचे खासदार उदयनराजे हे आपल्याविरोधात बोलून अडचणीत आणत असल्याने पवारांनी त्यांना आवरावे, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू, असा इशाराही रामराजेंनी दिला असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व भलतेच कोंडीत सापडले आहे.


भाजप-काँगे्रस-राष्ट्रवादी नेत्यांचा त्रिकोन

राष्ट्रवादीचे आधारस्तंभ असणाऱ्या रामराजेंना टार्गेट करण्यावर काँगे्रसचे आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भर दिलाय. आता राष्ट्रवादी पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही रामराजेंविरोधात शंखध्वनी सुरू केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजप-काँगे्रस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा त्रिकोन तयार झालाय, आता त्यातून काय साध्य होते, ते येणारा काळच ठरविणार आहे.

रामराजे शिवबंधन बांधण्याच्या चर्चेला उधाण...

राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना १९९९ मध्ये झाली. जिल्ह्यात या पक्षाची ताकद वाढविण्याचे काम माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. लक्ष्मणतात्या हयात नाहीत; मात्र राष्ट्रवादीचा प्रमुख आधारस्तंभ असणाऱ्या रामराजेंना त्यांच्या विरोधकांनी टार्गेट केलेले पाहायला मिळते.

फलटण मतदार संघातील त्यांचे विरोधक एकत्र येऊन आघाडी शासनाच्या काळातील त्यांच्या निर्णयांवर टीका करत आहेतच. मात्र, त्यांच्या पक्षाचे खासदार उदयनराजेही त्यांच्यावर तोंडसुख घेत असताना पक्षाध्यक्ष आक्रमक भूमिका घेत नसल्याने रामराजे प्रचंड नाराज झाले आहेत. आपणच वेगळी भूमिका घ्यावी, या विचारात ते शिवबंधन धागा बांधणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Web Title:  Ghayal Challenged the war of NCP, Baramati, Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.