ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 03:06 PM2021-01-08T15:06:47+5:302021-01-08T15:09:31+5:30

Udayanraje Bhosale SataraNews- काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सर्व सातारकरांना लागली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. त्याचबरोबर सातारकरांसाठी सेपरेटर सुरू झाला असून वचनपूर्ती पूर्ण केली आहे. याचे सर्व श्रेय साताकरांना आहे, असेही उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखविले.

Fulfillment of promise as grade separator opened! Inauguration by Udayan Raje | ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन

Next
ठळक मुद्दे ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने वचनपूर्ती!उदयनराजेंकडून उद्घाटन सर्व श्रेय सातारकरांना; नागरिकांसाठी खुला

सातारा : काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सर्व सातारकरांना लागली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. त्याचबरोबर सातारकरांसाठी सेपरेटर सुरू झाला असून वचनपूर्ती पूर्ण केली आहे. याचे सर्व श्रेय साताकरांना आहे, असेही उदयनराजेंनी यावेळी बोलून दाखविले.

वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सेपरेटरच्या उद्घाटनाचीच प्रतीक्षा होती. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याला मुहुर्त मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फित कापून ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ग्रेड सेपरेटरमधून वाहनातून प्रवासही केला.

यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, किशोर शिंदे, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, निशांत पाटील, मिलिंद काकडे, स्नेहा नलवडे, सविता फाळके, सीता हादगे यांच्यासह इतर नगरसेवक व सातारकर नागरिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर महत्वूपर्ण होता. यामुळे वाहतुकीची कोंडी टळणार आहे. हा ग्रेड सेपरेटर पूर्ण झाल्याने सातारा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेले वचन पूर्ण झालेले आहे. या सेपरेटरचे उद्घाटन झाले असून तो सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर करतो. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात नगरसेवकापासून झाली. पुढे आमदार, मंत्री आणि खासदारही झालो. यासाठी सातारकरांनी नेहमीच मला सहकार्य केले, असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

७५ कोटी रुपये खर्च...

सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या पावणे तीन वर्षांपासून यंत्रणा कामाली होती. सुरुवातीला ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले.
 

Web Title: Fulfillment of promise as grade separator opened! Inauguration by Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.