साताऱ्यात वादावादीतून चार वाहनांची दगडाने तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:43 PM2020-11-20T18:43:05+5:302020-11-20T18:44:17+5:30

Crimenews, sataranews, police गाडी देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात घडली.

Four vehicles pelted with stones in Satara | साताऱ्यात वादावादीतून चार वाहनांची दगडाने तोडफोड

साताऱ्यात वादावादीतून चार वाहनांची दगडाने तोडफोड

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात वादावादीतून चार वाहनांची दगडाने तोडफोड मध्यरात्रीची घटना; परस्परविरोधी तक्रारी

सातारा : गाडी देण्या-घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित बाळकृष्ण झोरे (वय २३, रा. बोगदा परिसर सातारा) याची गाडी देणे-घेणेवरून एका युवकाशी वाद झाला होता. या वादातूनच गुरुवारी मध्यरात्री रोहितने रस्त्यावर उभ्या असलेल्या चार वाहनांची दगडाने तोडफोड केली. हा प्रकार सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी वाहन मालकांना याची माहिती दिली.

शाहूपुरी पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाड्यांचा पंचनामा केला. नुकसान झालेले गाडीमालक अकबर कंकणइसे, इक्बाल शेख, शशिकांत बडेकर, आणि मोहिते असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे सुमारे २० ते २५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या गाड्या फोडल्याचा आरोप असलेला रोहित झोरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रोहित झोरे याच्या तक्रारीवरून अन्य एका युवकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होती.

Web Title: Four vehicles pelted with stones in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.