वणवा डोंगराला, आग वाहनाला...; खंबाटकी घाटात अग्नितांडव, दोन वाहने जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 04:12 PM2021-04-07T16:12:50+5:302021-04-07T16:13:35+5:30

fire : खंबाटकी घाटात लागलेल्या वणव्यामुळे ट्रकने पेट घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

fire at Khambhatki ghat in satara, two vehicles burnt | वणवा डोंगराला, आग वाहनाला...; खंबाटकी घाटात अग्नितांडव, दोन वाहने जळून खाक 

वणवा डोंगराला, आग वाहनाला...; खंबाटकी घाटात अग्नितांडव, दोन वाहने जळून खाक 

googlenewsNext

खंडाळा : पुणे सातारा आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात एका मालवाहतूक ट्रकने पेट घेतला. त्यानंतर ट्रकमधील पेटलेली पावडर रस्त्यावर पसरल्याने पाठीमागून येणारी कारनेही पेट घेतला. त्यामुळे या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली. खंबाटकी घाटात लागलेल्या वणव्यामुळे ट्रकने पेट घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

खंबाटकी घाटात दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास आगीमुळे धुराचे लोट दिसून येत होते . घाटातील जंगल भागात लागलेल्या वणव्यामुळे घाटातून जाणारा मालट्रक मधील पावडरने पेट घेतला , त्यापाठोपाठ मागून येणाऱ्या कारनेही पेट घेतला. 

महामार्गावरील या अग्नितांडवाने खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वणवा विझवण्याबरोबरच वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . आगीमुळे घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने  मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे.

Web Title: fire at Khambhatki ghat in satara, two vehicles burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.