गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:56 PM2019-09-02T15:56:30+5:302019-09-02T15:57:26+5:30

गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. 

Farmer dies after shock over decoration of Ganesh idol | गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देगणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यूऐन गणेशोत्सवात साबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

सातारा : गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशाच्या आगमनाची सध्या घरा-घरात जय्यत तयारी सुरू आहे. साबळेवाडीतील हणमंत साबळे हे सुद्धा आपल्या घरात शनिवारी रात्री गणेश मूर्तीसाठी सजावट करत होते.

यावेळी अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते बेशुद्ध पडले असावेत, असे समजून घरातल्यांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना तपासले असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ऐन गणेशोत्सवाच्या आगमनात साबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हणमंत साबळे हे शेती करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Farmer dies after shock over decoration of Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.