प्रत्येक व्यक्तीत गुरू भेटतो; निरीक्षणाचे सातत्य हवे; साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उलगडला यशाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 11:42 PM2019-09-04T23:42:50+5:302019-09-04T23:42:54+5:30

सातारा : मी व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी ! माझ्या आई-वडिलांनी शिक्षणाच्या बाबतीत काही कमी केलं नाही. सर्वोत्तम शिक्षण ...

In each person the Guru meets; Observe consistency; Satyara Collector Shweta Singhal unveils the journey of success | प्रत्येक व्यक्तीत गुरू भेटतो; निरीक्षणाचे सातत्य हवे; साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उलगडला यशाचा प्रवास

प्रत्येक व्यक्तीत गुरू भेटतो; निरीक्षणाचे सातत्य हवे; साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उलगडला यशाचा प्रवास

googlenewsNext

सातारा : मी व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी ! माझ्या आई-वडिलांनी शिक्षणाच्या बाबतीत काही कमी केलं नाही. सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नर्सरीमध्ये भटनाघर मॅडमनी हाती पेन्सील देऊन शिक्षणाला आकार दिला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत असताना माझी आई अनेकदा वेगवेगळे प्रश्न विचारून माझी फिरकी घेत असे. माझं कौतुक तर आई नेहमी करायची; परंतु वस्तुस्थितीचे भानही आईने मला दिले. प्रत्येक व्यक्तीत काहीना काही गुण हा असतोच. समोर आलेल्या व्यक्तीला वाचत राहणे, त्यांचे चांगले गुण आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. मेहनत करण्याची सवय स्पर्धा परीक्षेमुळे मिळाली.

फादर जोसेफ यांनी उत्तर ऐकून डोक्यावर ठेवला हात
बारावी झाल्यानंतर सेंट फ्रान्सिस स्कूल, शामली शाळेमध्ये प्रिन्सिपल फादर जोसेफ सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेविषयीचे अनुभव विचारले. मात्र मी इतरांपेक्षा वेगळे मत व्यक्त केले. शाळेत इंग्रजी विषय खूपच टफ भाषेत शिकवला. ते साध्या भाषेतही शिकवता आले असते, असं मी सांगताच गर्दीपेक्षा वेगळं मत व्यक्त केले म्हणून प्रिन्सिपलनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.

प्रिन्सिपल मीनाक्षी गोपीनाथ यांनी मनोधैर्य वाढवलं
निर्मल वर्मा हे मोठे साहित्यिक माझ्या महाविद्यालयात आले होते. त्यांच्या साहित्यावर मी पेपर प्रोजेक्ट केला होता. हा प्रोजेक्ट पाहून प्रिन्सिपल मीनाक्षी गोपीनाथ यांनी आपल्या कार्यालयात बोलावून माझे कौतुक केले. मीनाक्षी गोपीनाथ, मायावत्स यांच्यासह महिला सक्षमीकरणाचे रुप मी पाहिले. अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचे अनुभव मला या ठिकाणी ऐकायला मिळाले.

शाळा, महाविद्यालये शिक्षकांविना केवळ इमारती..!
शाळा, महाविद्यालयाच्या इमारती कितीही मोठ्या असू द्या; परंतु शिक्षकाविना त्या केवळ इमारती ठरतील. मुलांना घडविण्यात शिक्षकांचा ‘रोल’ अत्यंत महत्त्वाचा आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांवर त्यांचे लक्ष असते. आपल्या मुलाला जितका वेळ देतात, त्यापेक्षा किती तरी वेळ हे शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देत असतात. त्यामुळे शिक्षकाचा आदर, सन्मान ठेवून त्यांची शिकवण प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारली पाहिजे.

दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज हे अत्यंत प्रसिद्ध असे महाविद्यालय आहे. सातारा जिल्ह्यातही माझ्या कॉलेजचे विद्यार्थी पाहायला मिळाले. माझी बेस्ट फे्रंड श्रीलंकेची होती. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मिळाला. माझ्या मैत्रिणीला लंकेत रावणाविषयी काही आहे का? हा प्रश्न विचारला होता. त्यावर कुठला रावण आणि कुठलं काय? असं ती म्हणाली होती. त्यामुळे आपण केवळ ऐकीव गोष्टींवर लक्ष ठेवून मत तयार करायचं नाही, असं मी तेव्हाच ठरवले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत असताना प्रा. माजिद हुसेन हे भूगोल विषयाचा सखोल अभ्यास असलेले शिक्षक मला भेटले. त्यांचं नुकतंच निधन झालं. मला या घटनेनं अत्यंत दु:ख झालं.

Web Title: In each person the Guru meets; Observe consistency; Satyara Collector Shweta Singhal unveils the journey of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.