शासनाच्या निषेधार्थ खेकडे वाटप, पाटणला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:46 PM2019-07-24T12:46:00+5:302019-07-24T12:47:42+5:30

पाटण तालुक्यातील धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित आहेत. काही लघु पाटबंधाऱ्याची कामे रखडली असून, त्यात पाणीसाठा होत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी पाटण तहसीलदार कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना खेकडे वाटप करुन आंदोलन केले.

 Distribution of crabs in protest of government, agitation to Patan | शासनाच्या निषेधार्थ खेकडे वाटप, पाटणला आंदोलन

शासनाच्या निषेधार्थ खेकडे वाटप, पाटणला आंदोलन

Next
ठळक मुद्दे शासनाच्या निषेधार्थ खेकडे वाटप, पाटणला आंदोलनखेकडे धरणात सोडण्याचा इशारा

पाटण : तालुक्यातील धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित आहेत. काही लघु पाटबंधाऱ्याची कामे रखडली असून, त्यात पाणीसाठा होत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी पाटण तहसीलदार कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना खेकडे वाटप करुन आंदोलन केले.

दरम्यान, हे अनोखे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शासनाला जागे करण्यासाठी तालुक्यातील सर्व धरणांमध्ये खेकडे सोडणार असून, खेकड्यांनी धरणे फोडल्यावर त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा विक्रमबाबा पाटणकर यांनी यावेळी दिला.

तहसीलदार रामहरी भोसले यांना आंदोलनांची माहिती देताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, ह्यपाटण तालुक्यात शंभर टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. याचे कारण म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे शासनाने संपादित केली म्हणूनच हे शक्य झाले. मात्र आजही हेच प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या मागण्यांसाठी शासनाकडे हात पसरत आहेत. चिटेघर, बिबी, साखरी, निवकणे हे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत, त्यात पाणीसाठा होत नाही. मग त्यासाठी संपादित केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत द्या आणि आजपर्यंत झालेली नुकसान भरपाई द्या.

प्रशासन आणि अधिकारी काहीही प्रयत्न करत नाहीत. त्यासाठी तालुक्यातील सर्व धरणांमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने प्रत्येकी एक हजारपेक्षा जास्त खेकडे सोडणार आहे. या खेकड्यांची वाढ होऊन ती धरणे तरी फोडतील किंवा अशा खेकड्यांची विक्री करून शेतकºयांना रोकडा तरी मिळेल. यावेळी रवींद्र सोनावले, दादा कदम आणि साखरी, बिबी, चेवलेवाडी आणि मणदुरे विभागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Distribution of crabs in protest of government, agitation to Patan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.