मुख्यमंत्र्यांसह आघाडीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:13 PM2020-11-04T19:13:42+5:302020-11-04T19:15:55+5:30

Crimenews, socalmedia, sataranews सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांवर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

Crimes against those who defame the alliance with the Chief Minister | मुख्यमंत्र्यांसह आघाडीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा

मुख्यमंत्र्यांसह आघाडीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसह आघाडीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा कऱ्हाडात फिर्याद : राष्ट्रवादी विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची तक्रार

कऱ्हाड : सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांवर कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील सुपने येथील रहिवासी असलेले अक्षय शिंदे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक म्हणून काम पाहतात. तसेच सचिन कुऱ्हाडे हे पक्षाच्या सोशल मिडीया सेलचे जिल्ह्याचे काम पाहतात.

दि. १२, १५, १६ आणि १९ ऑक्टोबर रोजी सोशल मिडीयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो टाकण्यात आल्याचे अक्षय शिंदे यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुऱ्हाड यांच्याकडून माहिती घेतली असता संबंधित सोशल मिडीया ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर नामक व्यक्तीने बनविला असल्याचे समोर आले. त्यामुळे मंगळवारी याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.

Web Title: Crimes against those who defame the alliance with the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.