कासवरील सहा हॉटेल चालकांवर गुन्हे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:23 AM2020-06-22T10:23:42+5:302020-06-22T10:27:22+5:30

सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सातारा कास मार्गावरील हॉटेल चालकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crimes against six hotel operators in Kas, violation of Collector's order | कासवरील सहा हॉटेल चालकांवर गुन्हे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

कासवरील सहा हॉटेल चालकांवर गुन्हे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

Next
ठळक मुद्देकासवरील सहा हॉटेल चालकांवर गुन्हेजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून सातारा कास मार्गावरील हॉटेल चालकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हॉटेल चालकांना काही अटी घालून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली होती. असे असताना सातारा- कास मार्गावरील हॉटेल किनारा, कास हिल रिसॉर्ट, ईगल, ऋणानुबंध, ब्ल्यू व्हॅली आणि स्वराज अशा सहा हॉटेल चालकांनी निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ हॉटेल सुरू ठेवले तसेच संबंधित हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असताना आढळून आले.

त्यामुळे पोलिसांनी आकाश जालिंदर उंबरकर, शंकर राजाराम जांभळे, प्रताप प्रदीप गरुड, पंकज श्रीधर भागणे, संजय दत्तात्रय शिंदे, संदेश हणमंत सपकाळ या सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Crimes against six hotel operators in Kas, violation of Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.