महिला व तिच्या मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन, विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:23 PM2020-05-26T15:23:23+5:302020-05-26T15:24:26+5:30

एका महिलेच्या घरात घुसून संबंधित महिला व तिच्या दोन्ही मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Crime against a youth for molestation | महिला व तिच्या मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन, विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

महिला व तिच्या मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन, विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

Next
ठळक मुद्देमहिला व तिच्या मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तनविनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

सातारा : एका महिलेच्या घरात घुसून संबंधित महिला व तिच्या दोन्ही मुलांना मारहाण करून अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रणव अविनाश लेवे (वय ३२, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिलेची मुलगी माहेरी आल्याचा राग मनात धरून प्रणव लेवे तिला मारहाण करू लागला.

यावेळी पीडित महिला व त्यांचा मुलगा हा वाद सोडविण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी लेवे याने त्यांनाही मारहाण करत घरातील साहित्यांची तोडफोड केली. तसेच लेवे याने स्वत:ची अंगावरील कपडे स्वत: काढून विवस्त्र झाला. स्वत:च्याच कपड्यावर सनीटायझर टाकून घट पेटविण्याची तसेच कुंटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली असल्याचे संबंधित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

औद्योगिक वसाहतीमधील दुकानात चोरी

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील अँड्रॉईड एन्टरप्रायजेस या दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी १३ हजार रुपये रोख व इतर साहित्य चोरून नेले.

सचिन सतीश शहा (रा. शाहूनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. १७ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शहा यांचे दुकान फोेडून पैसे व इतर साहित्य लांबविले.

अंगणवाडी सेविकेचा मोबाइल चोरीस

सातारा : अंगणवाडीच्या दैनंदिन कामासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आलेला मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार अंगणवाडी सेविका रंजना चव्हाण ( रा. आंबवडे बुद्रुक, ता. सातारा) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

अंगणवाडी सेविका रंजना चव्हाण यांनी दि. २२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरात खिडकीनजीक मोबाईल चार्जिंगला लावला होता. त्यावेळी अज्ञाताने खिडकीतून हात घालून मोबाइल चोरून नेला.

 

Web Title: Crime against a youth for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.