CoronaVirus :जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 02:42 PM2020-06-10T14:42:14+5:302020-06-10T14:43:57+5:30

सातारा जिल्ह्यात चारशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असतानाच बुधवारी जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषत: कऱ्हाड तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६६९ वर पोहोचला आहे

CoronaVirus: Another 20 corona infections in the district | CoronaVirus :जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित

CoronaVirus :जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधितकऱ्हाड तालुका पुन्हा चिंतेत ; बाधितांचा आकडा ६६९ वर

सातारा : जिल्ह्यात चारशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असतानाच बुधवारी जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषत: कऱ्हाड तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, जिल्ह्यात बाधितांचा आकडा ६६९ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. परंतु तितक्याच पटीने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल असलेल्या २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कऱ्हाड तालुका - १२, वाई तालुका - ३, सातारा तालुका - ३, जावळी तालुका - १, फलटण तालुका - २ अशा एकूण २० जणांचा समावेश आहे.

बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील तांबवे येथील २५ वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील ओझरे येथील ७५ वर्षीय पुरुष, कऱ्हाड तालुक्यातील तुळसण येथील २६, ६०, ५१ वर्षीय पुरुष, २८, ४० वर्षीय महिला, केसे येथील ५०,४२,६४,२० व ६० वर्षीय महिला, २० वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील ४२ वर्षीय महिला,  वाई तालुक्यातील वेरुळी येथील ४६ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलगा, २६ वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील कुसवडे येथील १९ व ४७ वर्षीय महिला, देगांव येथील ५५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ६६९ असून, यापैकी ४०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २८ जणांचा बळी गेला आहे. सध्या  २४० कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

Web Title: CoronaVirus: Another 20 corona infections in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.