corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:17 PM2020-09-14T18:17:44+5:302020-09-14T18:27:38+5:30

सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

corona virus: Who is responsible for the victims of corona ?, the question of deprivation | corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने

सातारा : सातारा जिल्ह्यात बेड विना आरोग्य सुविधेविना सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. ते थांबणार कधी आणि याला जबाबदार कोण, याची चौकशी व्हावी, या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

 सातारा जिल्ह्यामध्ये शासन व प्रशासन एकत्र मिळून येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी अपयशीच ठरल्याचे दिसत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यात कोवीड रुग्णांना कोणी बेड देता का बेड यासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरावे लागत आहे, रुग्णांला उपचाराविना आपला जीव सोडावा लागत आहे.याला जबाबदार कोण.

सातारा जिल्ह्यात आहे त्यामध्ये तालुकानिहाय अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालये आहेत, तसेच सर्व सुविधायुक्त खासगी होस्पीटल्स आहेत. इतकी व्यवस्था असताना फक्त जनतेला चांगली आरोग्य व्यवस्था देनेकरीता नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापनाखाली ईमर्जन्सी लागू करून सर्व खाजगी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये वेळीच सर्वची सर्व अधीग्रहीत करून लोकडाऊन काळातच सर्व सोईनीयुक्त बेडची व्यवस्था केली असती तर आजची ही वाईट परिस्थीती आलीच नसती.

आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्याच्या भुभागाचा विचार करता पाच कोविड सेंटर ऊभे करण्याची मागणी केली होती, याचा विचार केला असता तर आज ही वेळच आली नसती.

कोविड परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनात कारभारी कोण पाहिजे हेच जनतेला कळत नाही. जिल्हाधिकारी फक्त बाधित रुग्ण आणी बरे झालेल्या रुग्णांचे रोजच्या रोज आकडे जाहीर करतात, पण रोज किती बेड निर्माण केले, याची मात्र माहिती देत नाहीत.

ॲम्बुलन्स उपलब्ध होत नाहीत. आपत्ती व्यवस्थापनला फोन केल्यास वेगवेगळे फोन नंबर देऊन फोन करण्यास सांगतात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला एकाच ठिकाणाहून योग्य माहिती मिळत नसल्याने रुग्णाला घेऊन फिरावे लागत आसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.

कोविड रुग्णांना एकाच ठिकाणाहून सर्व माहिती देऊन रुग्णांला उपचारासाठी घेऊन जावे. होम आयसोलेशनचा पर्याय रद्द करण्यात यावा, सर्वांना वेळेत उपचार मिळाल्यास कोविड संकट येऊ शकतो. त्यासाठी फक्त घोषना करता प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी यावेळी केली.

Web Title: corona virus: Who is responsible for the victims of corona ?, the question of deprivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.