corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:47 PM2020-07-04T12:47:35+5:302020-07-04T12:49:30+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

corona virus: Two more infected deaths in the district, with 19 most positive; The number of victims is 53 | corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह

corona virus : जिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यू, जिहेत १९ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी दोन बाधितांचा मृत्यूजिहेत सर्वाधिक १९ पॉझिटिव्ह; बळींचा आकडा ५३

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील खटाव आणि वाई तालुक्यात रविवारी दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खटाव तालुक्यातील पडळमधील ५५ वर्षीय पुरुष तर वाई तालुक्यातील ब्राम्हणशाहीतील ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आठ तालुक्यातील ५६ जणांचा अहवाल शुक्रवारी रात्री बाधित आला. त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील लाखवडमधील २८ वर्षीय महिला आणि कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज येथील २३ वर्षीय युवक, मुंढेतील ४१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तसेच फलटण तालुक्यात १३ जण कोरोना बाधित आढळून आले. अलगुडेवाडीतील १४ वर्षीय मुलगी, रविवार पेठेतील ७, १२ आणि १६ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय पुरुष, ६८, ४२, वर्षीय पुरुष ३२ आणि २० वर्षीय युवक, १४ वर्षीय दोन मुली, २५ वर्षीय महिला, मलठणमधील ३९ वर्षीय महिलाचा समावेश आहे.

खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील २४ वर्षीय युवक, न्यू कॉलनीतील ३० आणि २३ वर्षीय युवक, देशमुख आळीतील ३५ आणि ४५ वर्षीय महिला, लोणंद मधील मऱ्याचीवाडीतील ३४ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

त्याचबरोबर सातारा तालुक्यातील जिहे येथेही रुग्ण संख्या वाढत असून, सर्वाधिक १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ४९ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय पुरुष, २० वर्षीय युवक, ८ वर्षीय मुलगा, ६८ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय पुरुष तसेच ८१ आणि ६२ वर्षीय पुरुष तसेच ४२ आणि ५७ वर्षीय महिला, ४ वर्षाची मुलगी, ३० वर्षाची महिला, १९ वर्षीय युवती, ३ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगी, ३२ वर्षीय महिला आणि ७० व ५५ वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोडमधील २० वर्षीय युवक, धावलीतील १७ वर्षीय मुलगा आणि पानमळेवाळीतील ४३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पाटण तालुक्यातही ९ कोरोना बाधित आढळून आले. मलवडीतील २४ वर्षीय युवक, मोरगीरीतील ३३ वर्षीय पुरुष, कासरूंडमधील ३५ वर्षीय पुरुष, चोपडीतील १६ वर्षीय मुलगी तसेच २४ वर्षीय युवती, बेलवडेतील ३६ वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडीमधील २८ वर्षीय युवक, गोकूळ येथील १८ वर्षीय युवक, मारुलमधील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वाई तालुक्यातील धर्मपूरीमधील ४६ वर्षीय पुरुषासह माण तालुक्यातील कुळकजाईतील २५ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: corona virus: Two more infected deaths in the district, with 19 most positive; The number of victims is 53

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.