corona virus -पुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:13 PM2020-03-20T17:13:06+5:302020-03-20T17:16:43+5:30

पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

corona virus - People coming from Pune-Mumbai to register: Collector's information | corona virus -पुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

corona virus -पुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Next
ठळक मुद्देपुणे-मुंबईतून येणाऱ्या लोकांची होणार नोंद: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती पोलीस पाटील, आशा वर्कर्सला नोंदीच्या सूचना

सातारा : पुणे-मुंबई येथून गावाकडे येणाऱ्या भूमिपुत्रांनी आपली नोंद गावचे पोलीस पाटील अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. ही माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार असून जागृक नागरिक या नात्याने संबंधितांनी ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा जिल्ह्यात परदेस वारी करुन तब्बल १८३ लोक आलेले आहेत. त्यापैकी ५८ लोक आधी आले. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. होम कॉरंटाईनमध्ये म्हणजे घरीच राहून उपचार सुरु ठेवण्यात आले. त्यांचा कॉरंटाईनचा कालावधी संपला आहे. तर आणखी १३३ लोकांना आयसोलेशन वॉर्ड तसेच होम कॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलेले आहे.

ज्यांचे वय ६0 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. १४ दिवस कॉरंटाईनवर ठेवणे जरुरीचे आहे.

दरम्यान, लग्न सोहळ्यासंदर्भात जो आदेश काढला आहे, त्याबाबत कोणत्याही प्रकारे ढिल दिली जाणार नाही. लग्नासाठी १0 पेक्षा जास्त लोक गोळा असलेले दिसले त्यावर पोलिसांची करडी नजर असून विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

महाबळेश्वर, पाचगणीकडे जाणाऱ्य ट्रॅव्हल्स रद्द करण्याचे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी ट्रॅव्हल्स मालकांना दिले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कोरोनाचा मॅप व्हॉटसअपच्या माध्यमातून फिरतो आहे. उत्सुकतेपोटी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपली फसवणूक होऊ शकते, असे आवाहन केले.

तिटकारा नको...माणुसकी दाखवा

कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले अथवा जे लोक संशयित आहेत, ते चुकीच्या वेळी चुकीच्या देशामध्ये गेले होते. त्यातून त्यांना संसर्ग झालेला आहे. त्यांना १४ दिवस कॉरंटाईनवर ठेवण्यात येत आहे. संबंधित व्यक्तिंचा अथवा त्यांच्या कुटुंबांचा तिटकारा न करता माणुसकी दाखवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले आहे.


स्टँपधारक आढळला तर तत्काळ कळवा

परदेशातून आलेल्या व्यक्तिंच्या तसेच कोरोना संशयित रुग्णांच्या हातावर स्टँप लावण्यात आले आहेत. अशा रुग्णांनी घराबाहेर फिरणे अपेक्षित नसून ते अधिक चिंतेची बाब ठरु शकते. लोकांनी याबाबत प्रशासनाला तत्काळ माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले.


अफवा अन दाखल गुन्हे

  • व्हॉटसअपवरुन सर्दी, खोकल्यावर ९ रुपयात उपचाराचे आमिष दाखविणाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा
  • कोरोना संशयित रुग्णांची नावे समाजमाध्यमांवर फिरविणाऱ्यावर गुन्हे
  • सातारा क्लबवर लोक एकत्रित जमले म्हणून गुन्हा दाखल
  •  पुसेगाव, दहिवडीतही अफवाप्रकरणी ५0५/ब अंतर्गत गुन्हा
  •  पाचगणी, महाबळेश्वरात विदेशी नागरिकांची माहिती दडविणाऱ्या हॉटेल मालकांवर गुन्हे
  • खोेजेवाडीत विवाह सोहळा ४00 ते ५00 लोक हजर गुन्हा दाखल
  •  ढेबेवाडी (ता. पाटण) सात लोक एकत्र जमले गुन्हा दाखल

Web Title: corona virus - People coming from Pune-Mumbai to register: Collector's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.