corona virus : जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:49 PM2020-06-24T16:49:05+5:302020-06-24T16:51:48+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, बुधवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ८५२ वर पोहोचला आहे. दरम्यान, रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही चांगले असून, एकाच वेळी तब्बल ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

corona virus: Five more corona infections in the district | corona virus : जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित

corona virus : जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह ; बाधितांचा आकडा ८५२

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, बुधवारी सकाळी आणखी पाचजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ८५२ वर पोहोचला आहे. दरम्यान, रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही चांगले असून, एकाच वेळी तब्बल ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात अचानक रुग्णांची संख्या वाढतेय तर कधी कमी होतेय. बुधवारी सकाळी पाचजण बाधित आढळून आले तर ३०५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कऱ्हाड तालुक्यातील बनवडीमधील ३२ वर्षीय युवक तसेच तारुख येथील २५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधित आला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील ४९ वर्षीय महिला, बोंडरीमधील ३४ वर्षीय पुरुष आणि साताऱ्याचे उपनगर म्हणून समजल्या जाणाºया वाढे फाटा येथील ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पुणे तसेच कऱ्हाड येथील कृष्णा मेडीकल कॉलेज येथून ३०५ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८५१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६७८ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर ४० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३३ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

Web Title: corona virus: Five more corona infections in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.