corona virus : जिल्ह्यात नवे २८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:20 PM2020-06-27T15:20:27+5:302020-06-27T15:21:52+5:30

सातारा जिल्ह्यात शनिवारी नवे २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा आता ९१९ वर पोहोचला आहे. दरम्यान, १८५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

corona virus: 28 new corona positive in the district | corona virus : जिल्ह्यात नवे २८ कोरोना पॉझिटिव्ह

corona virus : जिल्ह्यात नवे २८ कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात नवे २८ कोरोना पॉझिटिव्हबाधितांचा आकडा ९१९ वर; १८५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात शनिवारी नवे २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा आता ९१९ वर पोहोचला आहे. दरम्यान, १८५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत शनिवारी बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सातारा, वाई, खटाव, खंडाळा, पाटण, कºहाड, कोरेगाव आणि जावळी तालुक्यांील रुग्णांचा समावेश आहे. या कोरोना बाधित २८ रुग्णांमध्ये २१ पुरुष तसेच ७ महिलांचा समावेश आहे. यात मुंबई, ठाणे येथून प्रवास करून आलेले ६ प्रवासी आणि १८ निकटसहवासित आणि ४ सारीचे रुग्ण आहेत.

सातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील ४५ वर्षीय महिला, राजापुरामधील ३९ वर्षीय पुरुष आणि आसवलीतील २७ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाई तालुक्यात चारजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कडेगावमधील ३४ वर्षीय पुरुष, पसरणीतील ४८ वर्षीय पुरुष, अमृतवाडीमधील ५० वर्षीय पुरुष आणि बावधन येथील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

खटाव तालुक्यातील मायणी येथील २९ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील शिंदे वस्ती (लोणंद) येथील ३८ वर्षीय महिला आणि आसवलीतील २७ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळून आला. जावळी तालुक्यातील रामवाडीमधील ६५ वर्षीय पुरुष तसेच ६० वर्षीय महिला आणि आखेगनी (रांजणी) येथील ४२ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आला. तसेच कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील २६ वर्षीय युवकालाही कोरोना झाला.

कऱ्हाड तालुक्यामध्ये सर्वाधिक १३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये तारूखमधील २१ आणि २२ वर्षीय युवक तसेच २७, २८ व ४८ वर्षीय पुरुष, ४५ व ५० वर्षीय महिला, चरेगावमधील ४ वर्षीय बालक, तसेच ३८ आणि ३६ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, बनवडीतील २९ वर्षीय पुरुष, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठेतील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पाटण तालुक्यातील उरूलमधील ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली.

जिल्ह्यात आत्तापर्यंत ९१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १८३ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

Web Title: corona virus: 28 new corona positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.