corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, बळी १३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:37 PM2020-08-01T18:37:41+5:302020-08-01T18:39:24+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आजवरचा एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण २२८ रुग्ण शुक्रवारी आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ४,०५३ वर पोहोचला आहे.

corona virus: 228 new corona patients in the district, 130 victims | corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, बळी १३०

corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, बळी १३०

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, बळी १३०बाधित ४०५३, मुक्त २०३६; चार हजारांचा टप्पा पूर्ण

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आजवरचा एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण २२८ रुग्ण शुक्रवारी आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ४,०५३ वर पोहोचला आहे.

दरम्यान, दिवसभरात ५४ जणांना घरी सोडण्यात आले असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता २०३६ झाली आहे. तसेच ५५५ जणांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी रात्री १६३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

यामध्ये विशेष म्हणजे जिल्'ातील सर्व अकरा तालुक्यांत बाधित रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
पाटण तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले. यामध्ये त्रिपोडी १, शिंदेवाडी १, मल्हारपेठ १ तर नेरले येथील एकाचा समावेश आहे.

वाई तालुक्यात ९ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये बोरगाव १, पसरणी २, यशवंतनगर १, बोपेगाव १, परखंदी १, वाई १, मुंगसेवाडी १ तर धनगरवाडी येथील एकाचा समावेश आहे.
कºहाड तालुक्यात सर्वाधिक ५० रुग्ण आढळून आले. यामध्ये शामगाव ३, कालवडे ४, शनिवार पेठ २, घरलवाडी १, वडगाव ५, शिवडे २, कऱ्हाड १, उंब्रज २, शनिवार पेठ ५, आगाशिवनगर ७, गजानन हौसिंग सोसायटी १, गुरुवार पेठ १, कृष्णा हॉस्पिटल १, कोयना वसाहत ८, मलकापूर १, मंगळवार पेठ १, रविवार पेठ १, रेठरे बुद्रुक १ तर सह्याद्री हॉस्पिटल येथील तिघांचा समावेश आहे.

खंडाळा तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले. यामध्ये बावडा २, पंढरपूर फाटा २, विंग २, खंडाळा ३, पाडेगाव १, राजेवाडी १, मंडई कॉलनी शिरवळ १ तर मोरवे येथील एकाचा समावेश आहे.
सातारा शहर आणि तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले.

साताऱ्यातील भवानी पेठ २, गडकर आळी ५, नागठाणे १, यादोगोपाळ पेठ १, अतीत १, औंध १, गोडोली १, शिवथर १, शाहूपुरी १ तर सदर बझार येथील एकाचा समावेश आहे. माण तालुक्यात दहिवडी येथील ३ तर शिंगणापूर येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे.

कोरेगाव तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले. यामध्ये वाठार स्टेशन १, पिंपोडे २, वाघोली ४, वाठार किरोली १, कोरेगाव २, रहिमतपूर १ तर कुमठे येथील एकाचा समावेश आहे. खटाव तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले. यामध्ये खटाव १, वडूज २ तर मायणी येथील दोघांचा समावेश आहे.

फलटण तालुक्यात १७ रुग्ण आढळून आले. यामध्ये जिंती नाका ३, लक्ष्मीनगर १, मुंजवडी ८, रविवार पेठ १, सासवड २, पाडेगाव १ तर उपळे येथील एकाचा समावेश आहे. महाबळेश्वर तालुक्यात १९ रुग्ण आढळून आले.

रांजणवाडी ११, गोडवली ३, मल्होत्रा भवन भोसे खिंड २ तर पाचगणी येथील तिघांचा समावेश आहे. जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी या एकट्या गावामध्ये १७ रुग्ण आढळून आले तर सायगाव येथे एक रुग्ण बाधित आढळून आला.

खासगी प्रयोगशाळेचे २५ अहवाल...

कोरोना बाधितांमध्ये सातारा तालुका- १६ (सातारा शहर ७), जावळी तालुका-२, वाई तालुका-१, माण तालुका-१, पाटण तालुका-१, खटाव तालुका-१, खंडाळा तालुका-१, इचलकरंजी (कोल्हापूर)-१, कडेगाव सांगली येथील एकाचा समावेश आहे.

कोरोनामुक्तीचा आकडा दोन हजार पार

जिल्ह्यात आतापर्यंत ४०५३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी २०३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १३० जणांचा मृत्यू झाला. सध्या १८८६ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

Web Title: corona virus: 228 new corona patients in the district, 130 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.