corona in satara- जवानासह एकाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:38 PM2020-03-26T19:38:04+5:302020-03-26T19:39:21+5:30

सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

corona in satara- Police investigating the beating of one with Javana | corona in satara- जवानासह एकाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी

corona in satara- जवानासह एकाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी

Next
ठळक मुद्देजवानासह एकाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशीपोलीस अधीक्षकांचे आदेश : चौकशीअंती दोषींवर कारवाई होणार

सातारा : सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

माण तालुक्यातील पळसावडे येथील जवान दत्ता शेंडगे हे दोन दिवसांपूर्वी सुटीसाठी गावी आले आहेत. शेंडगे हे त्यांच्या अंगणामध्ये एका व्यक्तीशी बोलत असताना म्हसवड पोलिसांनी जवानावर लाठी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

या प्रकारानंतर जवान दत्ता शेंडगे यांनी सोशल मीडियावर घडलेला प्रसंग कथन केला. पोलिसांकडून विनाकारण मारहाण झाल्याचा आरोप शेंडगे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही शेंडगे यांनी केली होती.

दरम्यान, दुसरी घटना साताऱ्यातील राधिका रस्त्यावर बुधवारी दुपारी घडली. एक व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी चालत जात असताना पोलिसांनी त्याला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीनेही पोलिसांना मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ संबंधित पोलिसांची पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: corona in satara- Police investigating the beating of one with Javana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.