Car crash on pune satara road | अपघातात कारचा चक्काचूर
अपघातात कारचा चक्काचूर

वेळे : महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत शुक्रवारी (आज) रात्री 12.30 वाजता कारचा अपघात झाला. या अपघात कार चालक किरकोळ जखमी झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्विफ्ट कार घेऊन चालक मारुती रामचंद्र पिसाळ (वय 45) रा.कुरवली ता.फलटण, जि.सातारा हे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. वेळे येथे आल्यावर या कारचालकाचा वाहनवरील ताबा सुटला व ही कार विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर येऊन एका अनोळखी गाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की याचा भयंकर मोठा आवाज संपूर्ण परिसरात झाला. या धडकेत गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातातील दुसऱ्या गाडीची डिझेल टाकी फुटल्याने संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले होते.

हा कार चालक दारूच्या नशेत वाहन चालवित होता. त्यामुळेच वाहनावरील ताबा सुटला. परंतु या भीषण अपघातात हा कारचालक थोडक्यात बचावला. त्याच्या हाताला किरकोळ खरचटले असून तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता.
हा अपघात घडला त्यानंतर रात्र गस्तीला असणारे पोलीस घटनास्थळी त्वरीत दाखल झाले व संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. सदरील घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.


Web Title: Car crash on pune satara road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.