ढगाच्या अभ्यासासाठी महाबळेश्वरच्या आकाशात रोज एक फुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:54 PM2021-11-21T17:54:29+5:302021-11-21T17:55:01+5:30

जगदीश कोष्टी चांगला पाऊस पडण्यासाठी बाष्पयुक्त काळे ढग असणे आवश्यक असते. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ढगामधील बाष्प, आर्द्रता, धुलिकणांचा ...

A bubble in the sky of Mahabaleshwar every day for the study of clouds | ढगाच्या अभ्यासासाठी महाबळेश्वरच्या आकाशात रोज एक फुगा

ढगाच्या अभ्यासासाठी महाबळेश्वरच्या आकाशात रोज एक फुगा

googlenewsNext

जगदीश कोष्टी

चांगला पाऊस पडण्यासाठी बाष्पयुक्त काळे ढग असणे आवश्यक असते. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ढगामधील बाष्प, आर्द्रता, धुलिकणांचा अभ्यास होणे गरजेचे असते. यासाठी महाबळेश्वरमध्ये ढग संशोधन केंद्र कार्यरत आहे.महाबळेश्वर अंतिउंचीवर असल्याने ढग खूपच खाली आलेले असतात. तेथील ढगांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणाहून दररोज एक फुगा आकाशात सोडला जातो. यामुळे शास्त्रज्ञांना चांगली मदत होत असते. विज्ञान आणि आधुनिक युगाची देणगी आहे. महाबळेश्वरातअसणारे अणु संशोधन केंद्र विज्ञानाचे क्रांती म्हणावे लागेल.

पूर्वी विमानांच्या मदतीने ढगांमध्ये शिरून ढगांचे निरीक्षण केले जात असे मात्र या अभ्यासादरम्यान नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाची परवानगी मिळविण्यापासून ते ढगांमध्ये पोहोचेपर्यंत ढगांच्या मुळ परिस्थितीत बदल होत असे. त्यामुळे संशोधनात अडचणी निर्माण होत असत.
या सर्व समस्या लक्षात घेता भारत सरकारच्या मान्सूनी मिशन या कार्यक्रमांतर्गत महाबळेश्वरात संशोधन केंद्र साकारण्यात आलेले ढग जमिनीवर असतात. त्यामुळे येथे ढगांची निरीक्षण करणे त्यांचा अभ्यास करणे अधिक सोपे झाले. तापमान आर्द्रता बाष्पीभवन रेडिएशन आदींचा अभ्यास येथील प्रयोगशाळेत केला जात आहे. सुमारे ३५ किलोमीटर परिसरातील घटकांचे विश्‍लेषण या संशोधन केंद्रात केले जाते.

विमानाच्या माध्यमातून चालणाऱ्या ढगांच्या संशोधनासाठी वापरली जाणारी सर्व यंत्रणा येथील प्रयोगशाळेमध्ये बसविण्यात आली आहे. यावर आधारित ढगांनी यांच्या संशोधनाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. प्रयोगशाळेच्या अंतरंगातून आणि वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे धूलिकण यांचा परस्परसंबंध त्यांचे होणारे परिणाम अभ्यासणे याचे एक प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. जैविक घटकांवर होणारा परिणाम आहे. या प्रयोगशाळेतून अभ्यासला जातो. ढगांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी यंत्रणा प्रयोगशाळेत आहे. पावसात काम करू शकतील अशी यंत्रे या प्रयोगशाळेच्या छतावर बसविण्यात आले आहेत. या यंत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. या नोंदीच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीचे आलेख तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे.

मांढरगडावरही ढग संशोधन केंद्र

मांढरगडावर सुमारे तीन गुंठे जागेत २०१२ मध्ये ढग संशोधन केंद्र सुरू केले होते. या ठिकाणीही पावसाळ्यापूर्वीच्या पांढऱ्या ढगांचा अभ्यास, काळे ढग, त्यांचा वेग, त्यांची उंची, त्यामध्ये असलेल्या बाष्प, आर्द्रतेचा अभ्यास केला जात होता. २०१९ ला येथील काम बंद करण्यात आले. त्यानंतर २०२० मध्ये तेथील यंत्रणा काढून नेण्यात आली.

पंधरा किलोमीटर अंतरातील अभ्यास

मांढरगडावर उभारलेल्या ढग संशोधन केंद्राची क्षमता पन्नास किलोमीटर होती. मात्र येथे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरात येणाऱ्या ढगांबाबत अभ्यास केला जात होता. या ठिकाणी असलेली यंत्रणा विविध निरीक्षणे करून नोंदी नोंदवत होती.

अमेरिकेकडून देखभाल

या ठिकाणी कार्यरत असलेली यंत्रणा कधी बंद पडली, तर अमेरिकेतील तंत्रज्ञ मंडळी भेट देऊन देखभाल करत असत. तेथील अधिकारी येथे येऊन दुरुस्ती करत होते.

Web Title: A bubble in the sky of Mahabaleshwar every day for the study of clouds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.