Body of a woman in a drinking well at Saidapur | सैदापूर येथे पाणी पिण्याच्या विहिरीत महिलेचा मृतदेह

सैदापूर येथे पाणी पिण्याच्या विहिरीत महिलेचा मृतदेह

ठळक मुद्देसैदापूर येथे पाणी पिण्याच्या विहिरीत महिलेचा मृतदेहआत्महत्या की घातपात, याबाबत तपास सुरू

सातारा : सैदापूर (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत महिलेचा मृतदेह आढळ्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पाटील दत्तात्रय अर्जुन पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर गावच्या हद्दीत मसवटा नावाच्या शिवारात ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीत रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास एक मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

याबाबत तालुका पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत संबंधित महिलेची ओळख पटली नव्हती.

ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळल्याने सैदापूर परिसरातील ग्रामस्थांच्यात खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा मृत्यू आत्महत्या की घातपात, याबाबत सातारा तालुका पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Body of a woman in a drinking well at Saidapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.