भांबवलीचं जंगल औषधी वनस्पतीचं आगारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 08:20 PM2020-01-15T20:20:42+5:302020-01-15T20:22:53+5:30

चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे घातकी मानले जाते.

Bhambavali forest is the herb of the herb! | भांबवलीचं जंगल औषधी वनस्पतीचं आगारच !

भांबवलीचं जंगल औषधी वनस्पतीचं आगारच !

Next
ठळक मुद्देरानफुलांचा मेळा : रामेटा, निगडी, महाकारवी, निरडी आदी फुले

पेट्री: सातारा शहराच्या पश्चिमेस भांबवली पुष्प पठारावर पावसाळ्यात रंगोत्सव भरतो. तर हिवाळ्यात भांबवलीच्या जंगलात अनेक रानफुले उमलली आहेत. हा फुलोत्सव सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कास पठारपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. त्याचबरोबर भांबवलीचे जंगल औषधी वनस्पतीचं आगारच बनलं आहे.

भांबवली परिसर झाडेझुडपे विविध रंगांच्या फुलांनी बहरली आहे. गुलाबी, पिवळी, निळी, राखाडी, पांढरी आदी रंगाची उधळण केलेला रानफुलांचा खजिनाच भांबवलीत आहे. बरीचशी फुले पांढºया रंगाची तर सोनेरी रामेटाचा बहर काही औरच आहे. या परिसरात भेट देणाºया पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
भांबवलीतला रानफुलांचा मेळा हा अपूर्व व नेत्रदीपक आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यत विविधरंगी रानफुलांचा बहर पाहून मन प्रसन्न तर होते. चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे घातकी मानले जाते.

हिरव्या टॉवररुपी झुडपावरील निळी म्युतीन फुले मनमोहक दिसतात. महाकारवी सात वर्षांतून फुलते, तर निळी विटाकारवी दरवर्षी फुलते. निगडीची तीन पाने बेलपत्र म्हणून वापरली जातात. निगडीचा वापर वनोऔषधी होतो, तर त्याची आकाशी रंगाची फुले सुंदर व आकर्षक दिसतात. निरडीची फूल लाल रंगाची असून, फुलांची भाजी चविष्ट असते. गंगोत्रीच्या लाल फुलांचा गुच्छ व त्यावर डोलणारा पांढरा केसर मनाचा ठाव घेत असून, हे झुडुप तापावर रामबाण उपाय म्हणून मानले जाते. पांढºया रंगाची भालग्याची फुले आकाशातील चांद ताऱ्यांसारखी लुकलुक करत आहेत, असे भासते.

पिवळी शेळकीची फुलं रानातिलकाना कोपºयात डुलताना पाहावयास मिळतात. निळा काटेरी सराटा म्हणजे जणू काही निळ्या रंगाचे पाखरूच. भांबवली परिसरातील रानफुलांचा मेळा म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभव असतो. निसर्गाचा तो नजारा शब्दबद्ध करू शकत नाही. सप्टेंबरमध्ये रानफुले फुलतात ते माहीत होते. पण जानेवारीत रानफुलांचा मेळा भरतो, हे बहुतेकांना माहीतच नाही. विविध प्रकारची औषधी झाडेझुडपे जंगलात असून, प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मुरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल आदी आहेत.
 

  • भांबवलीचे पुष्ठ पठार अद्यापही दुर्लक्षित

भांबवली येथील पठारावर मोठ्या प्रमाणावर फुले उमलत असून, जग त्यापासून अनभिज्ञ आहे. काय दैवदुर्विलास उत्तराखंडाची फ्लॉवर व्हॅली फक्त आठ किलोमीटरवर पसरली आहे. त्यापैकी कास पठार तसेच भांबवली पुष्प पठार हे तीन तालुक्यांत सातारा, जावळी ते थेट पाटणच्या परिसरापर्यंत पसरले आहे. त्याचा विस्तार खूप मोठा असून, त्याची मोजणी झालेली नाही. या पठारावर सर्व प्रकारची व दुर्मीळ फुले बहरतात. भांबवलीसारखे विर्स्तीण पुष्प पठार अद्यापही दुर्लक्षित आहे.

  • उगवते पर्यटनाचे दालन

भांबवली परिसरातून उरमोडी जलाशय, शिवसागर (कोयना) जलाशय, त्रिवेणी संगम, वासोटा किल्ला, सज्जनगड आदी ठिकाणावरून दूरवर दिसतात. दुर्बीण असल्यास अतिशय उत्तम आहे. भांबवली परिसरातील पठारावर व जंगलात बारमाही फुले नजरेत येतात; पण मुख्यत्वे करून पावसाळा व हिवाळ्यात रानफुलांचा बहर काही औरच आहे. साताºयातील उगवते पर्यटनाचे दालन म्हणून भांबवलीकडे पाहिले जाते.
कोट..
भांबवली हे फुलांचे गाव म्हटले तर वावगे ठरू नये. या हिवाळ्यात भांबवलीला जरूर भेट द्या. रानफुलांशी संवाद साधा, त्यांना तोडू नका वा इजा पोहोचवू नका. हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे संरक्षण व पावित्र्य ठेवणे पर्यटकांच्या हातात आहे.
-रवींद्र मोरे, पर्यटन प्रमुख,
स'ाद्री पठार विभाग विकास संघ, सातारा
फोटो १५ पेट्री नावाने सर्व फुले घेणे

 

Web Title: Bhambavali forest is the herb of the herb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.