कोरोनाच्या लढाईत सव्वाचार कोटींचा चुराडा, जिल्ह्यात २७ कोरोना  सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:25 PM2020-06-26T17:25:43+5:302020-06-26T17:27:55+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ जीवित हानीच नव्हे तर आर्थिक हानीही मोठ्या प्रमाणात झालीय. जिल्ह्यातील २७ कोरोना सेंटरवर तब्बल सव्वाचार कोटींचा खर्च झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

In the battle of Corona, there were 27 Corona centers in the district | कोरोनाच्या लढाईत सव्वाचार कोटींचा चुराडा, जिल्ह्यात २७ कोरोना  सेंटर

कोरोनाच्या लढाईत सव्वाचार कोटींचा चुराडा, जिल्ह्यात २७ कोरोना  सेंटर

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत सव्वाचार कोटींचा चुराडा, जिल्ह्यात २७ कोरोना  सेंटर पीपीई कीटवर ९७ लाख तर एसएमएस पॅकेजवर ८ लाख खर्च

सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ जीवित हानीच नव्हे तर आर्थिक हानीही मोठ्या प्रमाणात झालीय. जिल्ह्यातील २७ कोरोना सेंटरवर तब्बल सव्वाचार कोटींचा खर्च झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यात कोरोना सेंटरची उभारणी केली असून, जिल्ह्यात एकूण २७ सेंटर आहेत. या सेंटरमध्ये बाधित आणि हायरिस्क रुग्णांचे स्वॅब घेण्यात येतात. आत्तापर्यंत सुमारे ११ हजार ३४० रुग्णांच्या घशातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

पूर्वी कोरोना टेस्टसाठी सुमारे ४ हजार ५०० रुपये खर्च येत होता. मात्र, शासनाने यात बदल करत तो खर्च २ हजार २०० रुपयांवर आणला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सर्व कोरोना सेंटर देखरेख तसेच वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समितीमधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ५ कोटी ७९ लाख ५८ हजारांचा निधी मिळाला आहे. यापैकी ४ कोटी ३० लाख १५ हलार ६०३ रुपयांचा खर्च झाला असून, १ कोटी ४९ लाख ४२ हजार ३९७ रुपये शिल्लक आहेत.

कशासाठी व किती पैसे खर्च झाले...

  • पीपीई कीट - ९७ लाख ४१ हजार
  • व्हीटीएस कीट -८२ लाख ४५ हजार
  • सॅनिटायझर - ८ लाख ८५ हजार
  • बॉडी बॅग- ३ लाख १२ हजार
  • फेस शिल्ड- २ लाख ५६ हजार
  • थर्मा मीटर- ३४ लाख २६ हजार
  • डिजीटल पल्स आॅक्सीमीटर- २१ लाख ३६ हजार
  • एन ९५ सह अन्य मास्क- ६ लाख ६८ हजार
  • एसटी बस भाडे- ५ लाख ३१ हजार
  • एसएमएस पॅकेज- ८ लाख
  • महिला बचत गट- ५ लाख ८४ हजार
  • जिल्हा परिषद कॅन्टीनसाठी- ३ लाख ९७ हजार
  • झेडपी मुद्रणालय- ९ लाख ७१ हजार
  • सॉफ्टवेअर सिस्टिमसाठी ५ लाख
  • पोलिसांच्या शिट्टया व ओळखपत्र- २ लाख ४१ हजार
  • अधिकाऱ्यांचं इंधन- ३० लाख
  • औषध व साहित्य खरेदी- २३ लाख ६२ हजार

Web Title: In the battle of Corona, there were 27 Corona centers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.