वाई तालुक्यात कोरोनाचा चढता आलेख, एका दिवसात ७० जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:07+5:302021-04-10T04:39:07+5:30

वाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, वाईकरांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. शहरात मायक्रो प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यात ...

Ascending graph of corona in Wai taluka, 70 people infected in one day | वाई तालुक्यात कोरोनाचा चढता आलेख, एका दिवसात ७० जण बाधित

वाई तालुक्यात कोरोनाचा चढता आलेख, एका दिवसात ७० जण बाधित

Next

वाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, वाईकरांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. शहरात मायक्रो प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात केंद्रीय पथक आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे, वाई तालुका करोना अपडेट, गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी वाई तालुक्यात ७० पॉझिटिव्ह आले असून, वाई ३४ (शहर २६, सह्याद्रीनगर २, फुलेनगर १, शहाबाग १, एमआयडीसी ४) वेळे १, मेणवली १, गुळूंब २, कवठे १, खानापूर १, भुईंज ३, देगाव ३, शिरगाव १, बावधन ४ (वाघजाईवाडी १) परखंदी १, खोलवडी १, धोम १, आनेवाडी १, कडेगाव १,धावडी १, बोपर्डी १, वेरुळी २, वरखडवाडी २ असे ऐकून ७० रुग्ण कोरोनाच्या संसर्गाने पीडित आहेत. १ मार्चपासून दुसऱ्या लाटेत आजपर्यंत ८९८ बाधित सापडले असून, उपचार ७२० रुग्ण घेत असून, कोविडमुळे एकूण १६० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एप्रिलमध्ये आठ दिवसांत ४६० रुग्ण सापडले असून, त्यामुळे नागरिकांबरोबर स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Web Title: Ascending graph of corona in Wai taluka, 70 people infected in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.