आकाशाला भिडणारा अजस्त्र संडे १ सुळका ज्ञानदा कदमने केला सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:31 PM2021-11-24T13:31:21+5:302021-11-24T13:33:24+5:30

विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे.

Ajastra sunday 1 sulaka gyanada kadamne kela sir | आकाशाला भिडणारा अजस्त्र संडे १ सुळका ज्ञानदा कदमने केला सर

आकाशाला भिडणारा अजस्त्र संडे १ सुळका ज्ञानदा कदमने केला सर

googlenewsNext

लखन नाळे
वाठार निंबाळकर
सह्याद्री रांगेतील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील आकाशाला भिडणारा अजस्त्र संडे १ सुळका ज्ञानदा सचिन कदम हिने सर केला. रविवारी दि. २८ नोव्हेबर २०२१ रोजी होणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या रिव्हर सायक्लोथॉन मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन तिने केले.

ज्ञानदा सचिन कदम असे या चिमुरडीचे नाव. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वारुगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गिरवी हे तिचे मूळ गाव. मुळातच गडकोटांच्या कुशीत जन्म असणाऱ्या या चिमुरडीला त्याबद्दलची आवड व कुतूहल नसेल तर नवलच .तिच्यातील ही आवड ओळखून तिच्या आईवडिलांनी तिला ट्रेकिंग आणि सायकलिंग साठी प्रोत्साहन दिले. व तिच्या गोष्टींमध्ये खंड पडू दिला नाही . अगदी लहान वयातच वडिलांची जन्मभूमी असणाऱ्या गिरवी पासून सुरू होणारा किल्ले वारुगड यशस्वीरित्या सर केला आणि तिथून पुढच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

ज्ञानदाने २६ जानेवारी २०१९ ला प्रतापगड किल्ला सर केला. तर १३ डिसेंबर २०२० रोजी मुरलेल्या ट्रेकर्सना सुद्धा घाम फोडणारा किल्ले वासोट्याचा अवघड जंगल ट्रेक पूर्ण केला. तिने तिच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईच्या संकल्पनेतून जानेवारी २०२१ मध्ये ६ किल्ले एका महिन्यात यशस्वीरित्या सर केले . या सहा किल्ल्यांच्या मालिकेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे केली. नंतर स्वराज्याचे तोरण तोरणा, गडांचा राजा अन राजेंचा गड राजगड, तानाजी मालुसरेंच्या रक्ताने पावन झालेला किल्ले सिंहगड, स्वराज्याची राजधानी रायगड, किल्ले लोहगड अशा पद्धतीने किल्ल्यांच्या ट्रेकिंग ची मालिका सुरु झाली व आज तगायत ती सुरूच आहे.

कलावंतीण दुर्ग, किल्ले प्रबळगड व किल्ले पुरंदर हे ही तिने सर केले आहेत. नुकताच १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बाल दिनाचे औचित्य साधून जीवधन किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केला. याचबरोबर दिघी, दत्तगड, घोराडेश्वर, कडेपठार असे अनेक डोंगर तिने सर केले. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सुद्धा तिने सर केले आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे.

जेव्हा तिला गोल्डन मॅन नीरज चोप्रा यांनी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले हे सांगितले. तेव्हा मी सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा असा ठाम निर्धार तिने बोलून दाखवला

Web Title: Ajastra sunday 1 sulaka gyanada kadamne kela sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.